Homeउद्योगबार्टीचे काम प्रशंसनीय- एससी, एसटी कमिशनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचे प्रतिपादन

बार्टीचे काम प्रशंसनीय- एससी, एसटी कमिशनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचे प्रतिपादन

बार्टीचे काम प्रशंसनीय- एससी, एसटी कमिशनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचे प्रतिपादन

पुणे — दिनांक १२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेचे विविध क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रशंसनीय असून संस्था योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन अनुसूचित जाती -जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले. ते बार्टीच्या आढावा बैठकीत बोलत होते.

आज बार्टी मुख्यालयात त्यांनी संस्थेच्या अनेक योजनांची माहिती घेतली. बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी बार्टी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांना दिली. यावेळी निबंधक विशाल लोंढे, विभागप्रमुख रवींद्र कदम,डॉ. बबन जोगदंड, शुभांगी लेखाधिकारी नितीन चव्हाण, प्रज्ञा मोहिते,सुमेध थोरात, डॉ.सारिका थोरात, महेश गवई, आरती जाधव, यांची उपस्थिती होती.

यावेळी अडसूळ यांनी उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी ते म्हणाले,आपला देश प्रजासत्ताक झाल्यानंतर देश कसा चालवायचा ? याविषयी मंथन सुरू होते. परंतु ४० कोटीच्या देशात संविधान लिहिण्यासाठी कोणीही विद्वान नव्हता . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले. ते वकील, बॅरिस्टर प्रोफेसर झाले व त्यांनी जगातील सर्व राज्यघटनेचा अभ्यास करून आपल्याला संविधान दिले. ते कायदे पंडित होते. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज माझ्यासारखा सामान्य माणूस खासदार ,अनुसूचित जाती जमाती आयोगाचा अध्यक्ष होऊ शकला.जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर मी ,तुम्ही , आपण कुठे असतो. आपण बाबासाहेबा मुळेच त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज सन्मानाचे जीवन जगत असल्याचे गौरवोद्गार काढले. प्रारंभी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांच्या हस्ते त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, महामानव ग्रंथ, भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

आढावा बैठकीत बोलताना आडसूळ यांनी बार्टीच्या विविध योजना तळागाळातील अनुसूचित जातीतील वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक गतीने काम करावे,असे निर्देश दिले.

बार्टी अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी चांगले काम करत असून आपली मुले प्रशासकीय सेवेत अधिकारी, व उद्योजक होण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बार्टीने काम करावे, असे आवाहानही केले.

मा महासंचालक वारे यांनी बार्टी संस्थेची स्थापना , कामकाज , कार्यक्षेत्र,तसेच बार्टीमुळे आपले अनेक विद्यार्थी भरतीय नागरी सेवेत तसेच राज्य सेवेत अधिकारी म्हणून काम करत आहेत.तसेच अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन क्षेत्रात बार्टीचे नाव कोरले आहे. अनेक मुलांना रोजगार उपलब्ध झाला असून संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ सवलतीच्या दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच बार्टी महापुरुषांच्या समतेच्या विचाराचा प्रसार-प्रचार करत असल्याचे सांगितले.  सूत्रसंचलन नितिन सहारे यांनी तर आभार डॉ बबन जोगदंड यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

बलात्काराच्या आरोपी ज्योतिषाच्या मंदिरासाठी 2018 मध्ये 1.05 कोटी रुपये राज्य निधीमुळे वाद निर्माण झाला

0
पुणे: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मिरगाव गावात बलात्काराचे आरोपी अशोक खरात (६७) यांनी स्थापन केलेल्या श्री ईशानेश्वर मंदिराच्या विकासकामांसाठी २०१८ मध्ये १.०५...

सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत फक्त पीएमसी हद्दीत बांधकामे चालतात

0
पुणे: प्रदूषणाबाबत रहिवाशांनी आवाज उठवल्यानंतर पीएमसीने बुधवारी बांधकाम कामकाज दिवसाच्या 14 तासांसाठी मर्यादित केले.शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी बुधवारी जारी केलेल्या निर्देशात...

स्टँड-अपपासून ते स्ट्रीट बीट्सपर्यंत, राडा मराठी पॉप संस्कृतीला एका टप्प्यावर आणतो

0
पुणे: मराठी पॉप संस्कृती ऑनलाइन एक निर्विवाद भरभराटीच्या मध्यभागी आहे आणि ती उर्जेला बाटली लावण्याचा मार्ग असेल तर कदाचित ते राडासारखे दिसेल....

error: Content is protected !!