Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याप्रीपेड मीटर बसविण्याविरोधात आंदोलन

प्रीपेड मीटर बसविण्याविरोधात आंदोलन

‘वीज खासगीकरण विरोधी जन आंदोलन समिती’ने केला विरोध  

पुणे  (पुणे 24 तास ब्युरो )

  प्रीपेड मिटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात महावितरणच्या रास्तापेठ कार्यालयासमोर ‘वीज खासगीकरण विरोधी जन आंदोलन समिती’कडून आंदोलन करण्यात आले. स्मार्ट मीटर कशासाठी अदाणीच्या खिशासाठी, अदाणीचे कंत्राट रद्द झालेच पाहिजे, अदानी हटाव देश बचाव, मोदी शहा अदाणी नाका तोंडात जाईल पाणी, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने राज्यातील दोन कोटी ६५ हजार स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्याच्या निर्णयाला समितीचा तीव्र विरोध आहे. प्रीपेड स्मार्ट मीटर्स योजना ही वीज वितरण कंपनीने किंवा खासगी वितरक, कार्पोरेट घराण्यातील कंपन्या किंवा कोणत्याही खासगी कंपनीने यापैकी कुणीही राबविली तरी ती वीज ग्राहकांच्या हिताच्या विरुद्ध आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य वितरण क्षेत्राच्या खासगीकरणाचे पाऊल आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,  

‘महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन’चे कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर, ‘अंग मेहनती कष्टकरी पंचायती’चे नितीन पवार, ‘सिटू’चे पुणे जिल्हा अध्यक्ष काँ. अजित अभ्यंकर, ‘श्रमिक हक्क आंदोलन’चे बी युवराज व सागर धनराज, ‘महाऊर्जा कंत्राटदार असोसिएशन’चे योगेश घोरपडे, ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी’चे सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, नव समाजवादी पर्यायाच्या निहारिका भोसले, समाजवादी पार्टी पुणे शहर सरचिटणीस दत्ता पाखिरे, ‘हमाल पंचायत’चे सरचिटणीस गोरख मेंगडे, ‘कामगार एकता कमिटी’चे डॉ. प्रदीप आंदोलनात सहभागी झाले होते.

बाबा आढावा म्हणाले, ‘‘सध्या देशात केवळ दडपशाही सुरू असून व्यक्ती व विचार स्वातंत्र्यावर गदा आली आहे. सर्वच क्षेत्रात खासगीकरण सुरू असून त्यातून मोजक्या उद्योजकांचे हित पाहिले जात आहे. या सर्वांच्या विरोधात एकत्र येऊन एक मोठा लढा देण्याची गरज आहे. सरकारी विभाग बंद पाडून त्याचे खासगीकरण झाल्याचे अनेक उदाहरणे आहे. महावितरणचे तसेच व्हायला नको ही आपली जबाबदारी आहे.’’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!