माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’
न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन
मोहिनी मोहिते, संपादक
पुणे : देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची सलामी देत न्याती ग्रुपच्या वतीने आयोजित ‘स्वाभिमान नाईट’ उत्साह, अभिमान आणि भावनेने रंगली. या सोहळ्यात ७५० हून अधिक आजी-माजी सैनिक, संरक्षण दलातील अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.
फोटो ओळ ः गायक अमित कुमार यांचा पुणेरी पगडी घालून सत्कार करताना न्याती ग्रुपचे संचालक हरिश श्रॉफ
७५० हून अधिक आजी-माजी सैनिक, अधिकारी, कुटुंबीयांचा सहभाग
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते सुप्रसिद्ध गायक अमित कुमार यांचे ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’. अमित कुमार यांच्या सदाबहार गीतांनी किशोर कुमार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांच्या सुरांवर उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत संगीताचा मनमुराद आनंद लुटला.
न्याती ग्रुपचे संचालक हरिश श्रॉफ म्हणाले, “भारतीय सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाला कोणतीही किंमत देता येणार नाही. ‘स्वाभिमान नाईट’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
दरम्यान सीमेवर देशाचे रक्षण करताना कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची आठवण या कार्यक्रमातून करून देण्यात आली. देशसेवेनंतरही त्यांच्या योगदानाचा समाजाला विसर पडू नये आणि त्यांच्या शौर्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजनात कमांडर संजीव कृष्णा देशपांडे (निवृत्त), पल्लवी शेंडगे, स्वप्नील नेहरकर यांनी सहभाग घेतला

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















