शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन
मोहिनी मोहिते, संपादक
भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शिव मल्हार गडाचे महंत व वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे सर यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता शिव मल्हार गड, भोर, जि. पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. मार्तंड साठे सर भूषविणार आहेत.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रमुख सत्कारमूर्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
सत्कारमूर्ती
ह.भ.प सोहंम महाराज देहूकर तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज – युवा किर्तन रत्न समाज भूषण जीवनगौरव, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कृष्णात मगर – कृषिरत्न समाजभूषण जीवनगौरव, डॉ. राजेंद्र सर्जेराव मगर – साहित्यरत्न समाजभूषण जीवनगौरव, ह.भ.प सुभाष रामचंद्र साठे – जनतेतून सरपंच निमगाव मगर वारकरी रत्न समाजभूषण जीवनगौरव, विक्रम हनुमंत मगर – वक्तृत्व कला समाजभूषण जीवनगौरव, ह.भ.प प्रवीण महाराज लोखंडे – शिव मल्हार वारकरी कीर्तन रत्न समाजभूषण जीवनगौरव, मकरंद नागनाथ साठे – झुंजार पत्रकार समाजभूषण जीवनगौरव, मोहिनी मोहिते – झुंजार पत्रकार समाज भूषण जीवनगौरव, योगेश जाधव – झुंजार पत्रकार समाज भूषण जीवनगौरव, संतोष साठे – आदर्श निवेदक जीवनगौरव पुरस्कार, सचिन रणदिवे – झुंजार पत्रकार समाजभूषण जीवनगौरव
तसेच या सोहळ्यात ‘कलारत्न कला भूषण जीवनगौरव पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात येणार आहेत.
कलारत्न कला भूषण जीवनगौरव पुरस्कार नावे
अविनाश लक्ष्मण पवार, सोमनाथ सीताराम नांगरे पाटील, महेंद्र विश्राम गुरव, चंद्रभान महादजी सोन्नर (रामचंद्र वाघे), ह.भ.प. समाधान संदीपान नाडकर (समाधान माय महाराज), दादासाहेब रामभाऊ जगताप, राजेंद्र सुखदेव घोलप, संदीप सदाशिव सीताफळे, मायादेवी दिगंबर बाने, रोहन कुमार जाधव, दौलतराव भाऊराव सावळे पाटील, नाथाभाऊ बाबुराव गाडेकर, शिवाजी गोविंद शिंदे, बाबुराव नारायण खाताळ, प्रकाश माने वाळे खिंडीकर आणि सुभाष कोरेगावकर यांचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला मार्तंड देवस्थान पाली मुख्य मानकरी देवराजदादा पाटील, मार्तंड देवस्थान जेजुरी प्रमुख विश्वस्त मा. अध्यक्ष मंगेश घोणे, मा. गृहराज्यमंत्री रमेश बागवे, भाजपा उपाध्यक्ष महा. राज्य केशवराव उपाध्याय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पंजाब राज्य प्रभारी रवींद्र दळवी, आमदार अमित गोरखे, मार्तंड देवस्थान जेजुरी अध्यक्ष ऍड विश्वासराव पानसे, माळशिरस तालुका सभापती दत्ताभैय्या रावसाहेब मगर, शिंदे शिवसेना समन्वयक महा. राज्य ॲड वैजनाथ वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वाघ्या-मुरळी परिषद, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव, मल्हार भक्त आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्थळ : शिव मल्हार गड, भोर, जि. पुणे
दिनांक : 21 ऑगस्ट 2026
वेळ : सायंकाळी 6 वाजता

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















