रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड
पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली संघटना असून, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, राष्ट्रहित आणि शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने काम केले जाते.
राजू रावसाहेब ढावरे यांच्या नेतृत्वगुणांसह संघटन कौशल्य आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची असलेली भावना लक्षात घेऊन त्यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठाचे सिनेट सदस्य विनोद लोखंडे यांच्या हस्ते राजू रावसाहेब ढावरे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विनोद राम शिंदे, लहुजी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन इंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, देविदास वायदंडे, प्रा. सचिन पवार, श्री. माजिरे, राजेंद्र भोईवार, सुजित थोरात, सागर भडकुंभे, शेखर बुलाखे, सचिन साठे, विनोद ढावरे, अमोल गायकवाड, संतोष बावस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी राजू रावसाहेब ढावरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह


























