Saturday, August 22, 2026
spot_img
Homeपुणे मनपाछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता मिशनचे आंदोलन

“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा !

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या गैरकृत्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गंगावणे गट) व भीम आर्मी रिपब्लिकन एकता मिशन यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गंगावणे गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. सीताराम गंगावणे आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष वसीम भाई पैलवान यांनी उपस्थितांना संबोधित केले.

“राष्ट्रपुरुषांचा असा अवमान आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशारा यावेळी सीताराम गंगावणे आणि वसीम पैलवान यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व समाजघटकांना सोबत घेतले. त्यांनी जात-पात न मानता सर्व धर्मांचा आणि समाजघटकांचा आदर केला. त्यांच्या स्वराज्यात सर्वांना स्थान होते, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. उपस्थित कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम गंगावणे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष वसीम भाई पैलवान, पुणे जिल्हाध्यक्षा आम्रपाली पाटील, नदीम बाबरखान, भीम आर्मी पुणे शहर कार्याध्यक्ष बापू भाऊ चांदणे, विलसन डॅनियल, मंगेश भाऊ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि सर्व धर्मीयांच्या भावनांचा आदर राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

error: Content is protected !!