Saturday, August 22, 2026
spot_img
Homeकायदाज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती शिक्षा करण्याची शिफारस

पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या बॅगेतील रोख रक्कम, धनादेश, बँकेची कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाचे साहित्य रिक्षात राहिल्याच्या तक्रारीची योग्य ती दखल न घेतल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे (बक्कल क्र. ३०७५) यांची चौकशी करून योग्य ती शिक्षा करण्याची शिफारस पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने केली आहे.

तक्रारदार शरद नारायण जाधव (वय ७८, रा. येरवडा, पुणे) हे सेवानिवृत्त असून चालण्यासाठी वॉकरचा आधार घेतात. १८ जुलै २०२५ रोजी त्यांनी विश्रांतवाडी येथील बँकेतून पैसे काढले. त्यानंतर मित्रासह रिक्षाने प्रवास करताना मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी येथे ते उतरले. उतरताना वॉकरच्या सहाय्याने रिक्षेतून खाली उतरण्यास वेळ लागला. त्याचदरम्यान रिक्षाचालकाने रिक्षा पुढे नेल्याने त्यांची बॅग रिक्षेतच राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या बॅगेमध्ये रोख रक्कम, धनादेश, विविध बँकांची पासबुक व चेकबुक, घराच्या चाव्या, चष्मा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेनंतर जाधव यांनी त्याच दिवशी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, त्यांना दोन दिवस प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतरही साहित्य आणि पैसे मिळाले नसल्याने त्यांनी रिक्षाचा सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.

यानंतर माहितीच्या अधिकारातून प्रकरणाची माहिती मागविल्यानंतर त्यांची तक्रार ‘मिसिंग प्रॉपर्टी क्र. ४५१/२०२५’ म्हणून नोंदविण्यात आल्याचे समोर आले.

प्राधिकरणासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांना चालण्यासाठी वॉकरचा आधार घ्यावा लागतो, ही बाबही नोंदविण्यात आली. प्राधिकरणाच्या आदेशानुसार, तक्रारीची योग्य ती कार्यवाही न झाल्याचे तसेच संबंधित रिक्षाचालक आणि सीसीटीव्ही फुटेजबाबत आवश्यक कार्यवाही न झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांना दोषी धरून त्यांची चौकशी करून योग्य ती शिक्षा करण्याची शिफारस प्राधिकरणाने केली आहे. आदेशाची प्रत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

तक्रारदारांच्या वतीने ॲड. विशाल शिंदे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!