जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत इनलाइन फ्रीस्टाइल क्लासिक स्लॅलम स्केटिंगमध्ये पटकावले पाचवे स्थान
पुणे : द बिशप्स स्कूल, उंड्री येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी अविस्मा उपेश मर्लेचा हिने जपान येथे आयोजित सैतामा एशियन कप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा गौरव केला आहे. इनलाइन फ्रीस्टाइल क्लासिक स्लॅलम स्केटिंग स्पर्धेत अविस्माने पाचवे स्थान पटकावले.
अविस्मा महर्षी नगर, पुणे येथील शिवशंकर सभागृह येथे प्रशिक्षक प्रफुल चंदणे व अर्चना चंदणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करते. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि स्केटिंगविषयीची तिची आवड यामुळे तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली.
विशेष म्हणजे, रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (RSFI) मार्फत अविस्माने सलग तिसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. जपानमध्ये विविध देशांतील खेळाडूंच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत तिने आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली.
अविस्माच्या या यशामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्रासह तिचे कुटुंब, शाळा, प्रशिक्षक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























