Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यासैफ अली खानवरील हल्याबाबत मंत्री नितेश राणे यांचे यांचे मोठे विधानआळंदीतील हिंदू...

सैफ अली खानवरील हल्याबाबत मंत्री नितेश राणे यांचे यांचे मोठे विधान
आळंदीतील हिंदू महोत्सव कार्यक्रमात राणे यांचे वक्तव्य

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

‘अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेला बांगलादेशी होता. सैफ व्यवस्थित चालत येत होता. त्यामुळे सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वत:च चाकू मारून घेतला की काय,’ अशी शंका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आळंदीतील हिंदू महोत्सव कार्यक्रमात बुधवारी व्यक्त केली.

अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आळंदी आणि निगडी येथील कार्यक्रमांना राणे उपस्थित राहिले. आळंदीतील हिंदू महोत्सव कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘सैफ अली खान, नवाब मलिक, शाहरूख खानचा मुलगा यांच्याबाबत काही झाले, तरच बारामतीच्या ताईला पुळका येतो. त्या तातडीने पुढे येतात. मात्र, सुशांतसिंगच्या आत्महत्येवर त्या गप्प असतात. हिंदू अभिनेत्यांवरील, कलाकारांवरील हल्ल्यानंतर त्या काही बोलत नाहीत. बांगलादेशी अगोदर नाक्यावर उभे राहत होते. आता घरात घुसायला लागले आहेत. भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यांच्या घरात घूसून मारण्याचे प्रकार घडले. हिंदू समाज म्हणून एकत्र राहून जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे.’
‘प्रत्येक हिंदूच्या आयुष्यात अयोध्येत राम मंदिर पाहायला मिळाले, हा मोठा क्षण आहे. जे आपल्या हक्काचे आहे, ते घेणारच, हे या दिवसाचे महत्त्व आहे,’ असे ते म्हणाले. ‘हिंदू राष्ट्रात धर्मस्थळावर अतिक्रमण केले जाते. प्रमुख धर्मस्थळावर वक्फ बोर्डाने ताबेमारी सुरू केली आहे. भविष्यात आळंदीकडेही वाकड्या नजरेने पाहतील. त्यासाठी हिंदू समाजाने दक्ष राहिले पाहिजे. मंत्री झालो म्हणून काय झाले, मी अगोदर हिंदू आहे, हे विसरलो नाही. धर्माकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर मंत्रीपद बाजूला ठेवून त्याला जागेवर ठेवणार नाही. सर्वधर्म समभाव ही नाटके केवळ हिंदू समाजासाठी आहेत. ईद, मोहरम, चर्चमधील कोणत्याही कार्यक्रमात हिंदूंनी अडथळे आणले नाहीत. पण, गणपती, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगड मारण्याची हिंमत का होते? ‘सेक्युलर’ हा शब्द राज्यघटनेत नाही. काँग्रेसची नाटके आहेत. भारत देश हिंदू राष्ट्र आहे. येथे पहिले हिंदूंचे हित पाहिले जाईल. देशात, राज्यात हिंदूंचे सरकार आहे. गोरक्षकाला त्रास देणारा घरी सुखरूप जाणार नाही, याची काळजी पोलीस घेतील. कीर्तनकार सातत्याने हिंदुत्वावर बोलत असतात. त्यांच्या वाणीत समाज घडवण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे कीर्तनकारांनी हिंदू धर्माचे प्रबोधन करावे,’ असेही राणे यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्र्यांचे रक्त भगवे’
‘येणाऱ्या काळात राज्यात एक कत्तलखाना ठेवणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे रक्त लाल नसून, भगवे आहे. या सरकारमध्ये कॉलर टाइट करून जगायचे आहे. हिंदूंना त्रास झाल्यास अधिकारी पाठीशी उभे राहतील, याची ग्वाही देतो,’ असेही नितेश राणे म्हणाले. श्रीरामाचे मंदिर उभे राहिले, तेव्हा काही लोकांना हिरव्या मिरच्या लागल्या होत्या. काही हिरव्या सापांचे म्हणणे होते, की ‘जय श्रीराम’ म्हणू नका. त्यामुळे आपली ओळख दाखविणे काळाची गरज आहे. आपले सरकार नसताना राज्यात हिरवे गुलाल उधळून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात होत्या. पण, त्याला हिंदूंनी विधानसभेला उत्तर दिले. भगवे सरकार राज्यात बसवले, असेही मंत्री राणे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!