Wednesday, August 26, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याआई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत आणि मायेच्या ऊबेत मात्र कोणताही बदल झालेला नाही. आजही तेच प्रेम, तीच चिंता, तीच आपुलकी… जणू काळ त्यांच्या भावनांना स्पर्शही करू शकलेला नाही.

खरंच, कधी शांतपणे विचार केला आहे का—एक आई-वडील दहा मुलांचा सांभाळ करू शकतात; पण दहा मुले मिळूनही एक आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नाहीत. ही आजच्या काळाची कटू, पण खरी परिस्थिती आहे. आपण आजारी पडलो तर मित्र, नातेवाईक भेटायला येतात, दोन शब्द बोलतात आणि परत जातात. पण रात्रंदिवस दवाखान्यात आपल्या शेजारी बसून डोळ्यांत झोप न आणणारी आई, आणि उपचारासाठी लागणारे पैसे कसे जमवायचे या चिंतेत धडपडणारा बाबा—हे दृश्य कुणालाच दिसत नाही.

लहानपणापासून आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा, सुख, स्वप्नं बाजूला ठेवणारे हे दोन जीव. आपण काही अस्पष्ट बोललो, कुणालाच न समजणारे शब्द, तेव्हा फक्त आई-वडिलांनाच कळतं—आपण काय म्हणतोय, काय हवंय. आज मात्र परिस्थिती उलट झाली आहे. आई-बाबा फक्त एवढंच मागतात—थोडा वेळ, दोन प्रेमाचे शब्द, थोडी आपुलकी. पण आपणच अनेकदा त्यांच्याशी अशा शब्दांत बोलतो, जणू ते आपले शत्रूच आहेत.

आज आपण शिकलेलो आहोत, आधुनिक आहोत, पुढारलेलो आहोत असं समजतो; पण त्या शिकण्यामागचा पाया कोणाचा होता, हे विसरतो. कॉलेजच्या दिवसांत आईने शेजाऱ्याकडून बसच्या पासासाठीआणलेले पैसे, बाबांच्या अंगावर फाटलेले कपडे, पण मुलासाठी कर्ज काढून आणलेले नवे कपडे—ही त्यागाची जाणीव काळाच्या ओघात बोथट होत चालली आहे.

जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते, संपूर्ण समाज आपल्या विरोधात उभा राहतो; तेव्हा मात्र आई-वडील आपल्यासोबत उभे राहतात. कारण त्यांचा विश्वास अढळ असतो—माझं मूल वाईट असूच शकत नाही. चूक झाली, तरी ती सुधारण्यासाठी धावणारे पहिले पाय आई-वडिलांचेच असतात.

आज घराला घरपण आहे, आपुलकी आहे, माणुसकी आहे—ती फक्त आणि फक्त आई-वडिलांमुळेच. एखादी मुलगी सासरहून माहेरी जाते, तिचा मान-सन्मान, तिची ओळख ही फक्त आई-वडिलांमुळेच असते. आईकडे काही नसतं, तरीही मुलगी सासरी जाताना पिशवी भरून देणारी ही जुनी माणसं… ही जुनी माया आहे.

आई म्हणजे निःस्वार्थ प्रेमाची मूर्ती—जिच्या मायेची उब आयुष्यभर पुरते.

बाबा म्हणजे न बोलता झिजणारा आधार—जो आयुष्यभर आपल्यासाठी उभा असतो.

देवाकडे ते कधी मोठ्या अपेक्षा करत नाहीत. फक्त एवढंच मागतात—माझी मुलं सुखी राहो, सुरक्षित राहो.

म्हणूनच माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे—

परमेश्वरा, तुला जे हवं ते माझ्याकडून घे; पण माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावर राहू दे.

कारण या जगात सगळं परत मिळू शकतं,

पण आई-वडील परत कधीच मिळत नाहीत. “आई-वडील म्हणजे न बोलता झिजणारी देवमाणसं,

आपल्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य विसरणारी माणसं.

जग सगळं सोबत सोडून गेलं, तरी जे कायम उभे राहतात,

ते फक्त आई-वडीलच असतात—आशीर्वादाच्या रूपात.”

लेखक: मुबारक शहाबुद्दीन तांबोळी,

लायब्रेरियन,पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड एन्ट्रेप्रेन्योरशिप, पुणे 📞 मोबाईल: 91 58 55 89 30📧 ई-मेल: mubaraktamboli931@gmail.com.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!