Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी हा समारंभ एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करताना त्यांच्या व्यावसायिक जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवातही यावेळी साजरी करण्यात आली.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. हानी अहमद फरीद, जनरल सेक्रेटरी, Y & M AKI ट्रस्ट, तसेच मान्यवर पाहुणे हनीफ लकडावाला, ट्रस्टी, Y & M AKI ट्रस्ट आणि प्रा. (डॉ.) पोरिनिता बॅनर्जी, संचालक (कार्यवाहक), PIMSE उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक अकॅडमिक प्रोसेशनने झाली. त्यानंतर स्वागतपर भाषण आणि संस्थेच्या प्रमुख कामगिरींचे सादरीकरण करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. फरीद यांनी विद्यार्थ्यांना जागतिक संधींचा लाभ घेण्याचे आवाहन करत मोठी स्वप्ने पाहण्यास प्रोत्साहित केले. तर डॉ. लकडावाला यांनी सतत शिकत राहण्याचे आणि उद्दिष्टपूर्ण कृती करण्याचे महत्त्व सांगत पदवीप्राप्ती हा नव्या प्रवासाचा प्रारंभ असल्याचे नमूद केले.

या वेळी MBA, MBA-IT आणि MBA-HRD या अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देण्यात आले व टॉपर विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

संशोधन, स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या अॅड-ऑन स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमांच्या प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!