Homeताज्या बातम्यालुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे.

विद्यापीठाच्या ऑनरिस नॉमिनेशन अॅडव्हायझरी कमिटीच्या शिफारशीनुसार तसेच सिनेट आणि कार्यकारी परिषदेच्या मान्यतेनंतर त्यांना “डॉक्टरेट इन सोशल वर्क अँड फिलॅन्थ्रॉपी” ही पदवी बहाल करण्यात आली. मागील २७ वर्षांपासून समाजातील पीडित, कॅन्सरग्रस्त, निराधार आणि व्याधीग्रस्तांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या विरदी यांच्या सामाजिक कार्याची दखल या सन्मानातून घेण्यात आली आहे.

विरदी म्हणाले, “महाराष्ट्र साधुसंतांची भूमी आहे. या भूमीने आम्हाला सर्व काही दिलं, त्यामुळे समाजासाठी काहीतरी परत देणं हीच खरी उतराई आहे.” कॅन्सरग्रस्त आणि निराधारांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या हास्यातच खरा जीवनार्थ सापडतो. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा कुटुंबाकडून मिळाली. “माझ्या आजोबा, आई-आजी यांनी नेहमी शिकवलं की महाराष्ट्राने आपल्याला घडवलं आहे, त्यामुळे समाजासाठी काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.

फाउंडेशनच्या नावाबाबत सुरुवातीला मनात शंका होती, मात्र आईच्या सल्ल्याने दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “लोक काय म्हणतील यापेक्षा तू काय करतोस हे महत्त्वाचं,” हा सल्ला त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कॅन्सरग्रस्त मुलांशी झालेल्या भेटी, त्यांना चित्रपट दाखवण्यासाठी नेणे, त्यांना खाऊ देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहणे—या अनुभवांनी आयुष्याचा खरा अर्थ शिकवला असल्याचे त्यांनी सांगितले. “त्या मुलांच्या डोळ्यातला आनंद पाहिला की मी स्वतःला सर्वात श्रीमंत समजतो,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या भेटीचा अनुभवही त्यांनी सांगितला. “तुम्ही खरे हिरो आहात,” असे शब्द त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरले. तसेच एका लहान मुलाच्या निरागस आनंदाने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचेही त्यांनी नमूद केले.

“आनंद देणं हेच खरं जीवन आहे. समाजासाठी काहीतरी केल्याशिवाय खरा समाधान मिळत नाही,” असा संदेश देत विरदी यांनी आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. महाराष्ट्राने दिलेल्या संस्कारांची परतफेड गरजू आणि निराधारांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून करण्याचा आपला प्रयत्न कायम सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

error: Content is protected !!