Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याएससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. एससी आरक्षणाखाली बनावट जातीचे प्रमाणपत्र तयार करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बिऱ्हाडे दाम्पत्याने सांगितले की, उल्हासनगर महानगरपालिकेतील एका संशयित नगरसेविकेने खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचा लाभ घेत निवडणूक लढवली असून याबाबत गेले नऊ ते दहा महिने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी व आरटीआय अर्ज सादर केले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित नगरसेविका संगीता लखन उर्फ संगीता कंडारे या मागील ३० वर्षांपासून ओपन प्रवर्गातून निवडणूक लढवत होत्या. मात्र यावेळी त्यांनी एससी प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना नानासाहेब बिऱ्हाडे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. पुणे तहसील कार्यालयातील अधिकारी, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, मुदगुणे मॅडम तसेच पिंपरी-चिंचवड येथील काही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला.

बिऱ्हाडे यांनी सांगितले की, संबंधित नगरसेविकेला प्रशासनाकडून एका दिवसात माहिती उपलब्ध करून देण्यात आली, मात्र आम्हाला नऊ-दहा महिने उलटूनही योग्य माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे एससी समाजाला न्याय मिळावा आणि आरक्षणाचा गैरवापर थांबावा यासाठी आम्ही आमरण उपोषण सुरू केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात त्यांच्या वार्डातील पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!