HomeMumbaiमुंबई महापालिकेत ठाकरे गटाला गळती

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला गळती

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला पहिली गळती; नगरसेविका शिंदे गटाच्या संपर्कात

मुंबई : पुणे २४ तास- कल्याण-डोंबिवलीनंतर आता मुंबई महापालिकेतही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७च्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांनी ठाकरे गटापासून दूर जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाचे संकेत दिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

शिवसेना (ठाकरे गट)ने मंगळवारी सेना भवनात नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, डॉ. सरिता म्हस्के या बैठकीला तसेच गटनोंदणी प्रक्रियेलाही अनुपस्थित राहिल्या. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत निवडून आलेल्या म्हस्के सध्या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.

या घडामोडीमुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ६५ वरून ६४ वर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, म्हस्के यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाने किशोरी पेडणेकर यांची पालिकेतील गटनेतेपदी निवड करत संघटनात्मक तयारीही वाढवली आहे.

मुंबईपुरतेच नव्हे, तर कल्याण-डोंबिवली महापालिकेतही ठाकरे गटाला फटका बसला असून, तेथील ११ पैकी चार नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आगामी महापौर निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!