Thursday, October 15, 2026
spot_img
Homeक्राईमवाहतूक कोंडी मुक्त वाघोली साठी अतिक्रमणावर सर्जिकल स्ट्राईक

वाहतूक कोंडी मुक्त वाघोली साठी अतिक्रमणावर सर्जिकल स्ट्राईक

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीत केले स्पष्ट

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

वाहतूक कोंडी मुक्त वाघोली करण्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर संबंधित यंत्रणेच्या मदतीने सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश
कुमार यांनी स्पष्ट केले.
वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विभागाची संयुक्त बैठक वाघोलीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीपूर्वी त्यांनी चालत जावून वाहतूक कोंडीची करणे जाणून घेतली. या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ चारचे उपायुक्त हिम्मत जाधव, पीएमपीएमएलच्या दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, महावितरण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही. आसा कडक इशाराही त्यांनी दिला. वाहतूक कोंडीवर काय उपाययोजना केल्या गेल्या याचा १० फेब्रुवारी रोजी पुन्हा आढावा घेतला जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त बैठक आणि पाहणी दरम्यान विविध समस्या आणि त्या समस्यांचे निवारण कशाप्रकारे करता येईल यावर चर्चा झाली. या संदर्भात ५०० सूचना आल्या  होत्या. या प्रसंगी  रामदास दाभाडे, अनिल सातव, समीर भाडळे, संदीप सातव, मच्छींद्र सातव, चंद्रकांत वारघडे, आदी उपस्थित होते.
–

आयुक्तांनी दिलेल्या कडक सूचना

महापालिका, पी एम.आर डी ए सह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची चालढकल करून नये.
खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावर थांबायला नको.
वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करावी.
नशेचे पान विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करावी.

निधी कमी पडू देणार नाही

महापालिकेच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करून सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यासोबतच राज्य शासनाचा निधी कमी पडू देणार नाही. वाहतुकीला अडथळा ठरणार्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत यापुढे संबंधित विभागांनी चाल ढकलपणा करू नये. रस्ता दुरुस्ती व इतर कामांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. अशा स्पष्ट सूचना आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी बैठकीमध्ये दिल्या.

स्वतःहून अतिक्रमणे काढली

आयुक्त अमितेश कुमार, आमदार कटके व इतर अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी अतिक्रमणे काढण्याची चर्चा झाली. काही व्यापाऱ्यांनी रात्री स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!