पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात आज सकाळी ही भेट पार पडली.
काल रात्री पुण्यात विद्यार्थ्यांनी अचानक आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुमारे अर्ध्या तासाची सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या समोरच थेट MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
विद्यार्थ्यांवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी अपारदर्शकता या गोष्टींमुळे नाराज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आपला उद्वेग आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्तायादीत नाव न् आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























