Homeताज्या बातम्याFOGSI आणि Veha Foundation कडून Project MUKTA ची सुरुवात – Universal Antenatal...

FOGSI आणि Veha Foundation कडून Project MUKTA ची सुरुवात – Universal Antenatal Thalassemia Screening साठी Good Clinical Practice Recommendations (GCPR) जाहीर

FOGSI आणि Veha Foundation कडून Project MUKTA ची सुरुवात – Universal Antenatal Thalassemia Screening साठी Good Clinical Practice Recommendations (GCPR) जाहीर

पुणे :-  भारत हा Thalassemia capital of the world म्हणून ओळखला जातो. देशात अंदाजे १ ते १.५ लाख मुले Thalassemia Major ने प्रभावित आहेत आणि दरवर्षी १०,००० ते १५,००० नवीन बाळे Thalassemia Major सह जन्माला येतात. याशिवाय, सुमारे ४.२ कोटी भारतीय β-Thalassemia trait चे carriers आहेत. यामुळे हजारो कुटुंबांना धोका निर्माण होतो.

या आव्हानाला तोंड देण्यासाठी, Federation of Obstetric and Gynaecological Societies of India (FOGSI) आणि Veha Foundation यांनी आज Good Clinical Practice Recommendations (GCPR) जाहीर केले. हे मार्गदर्शक तत्त्वे Project MUKTA (Mission to Unite and Keep Thalassemia Away) या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग आहेत. या उपक्रमाचा उद्देश Thalassemia screening ला प्रत्येक गर्भवती स्त्रीच्या antenatal care मध्ये नियमित चाचणी म्हणून समाविष्ट करणे आहे.

हा उपक्रम डॉ. सुनीता तांडुलवडकर (President, FOGSI), डॉ. जयदीप टंक (Immediate Past President, FOGSI), रुमाना हमीद (Director, Veha Foundation) आणि डॉ. पूजा लोढा (National Convenor, Project MUKTA) यांच्या हस्ते पुण्यात सुरू करण्यात आला.

या वेळी बोलताना डॉ. सुनीता तांडुलवडकर म्हणाल्या:
“MUKTA म्हणजे मुक्त – आणि हाच आमचा उद्देश आहे. एक असे भविष्य जिथे कोणत्याही मुलाला अशा आजाराने त्रास होऊ नये, जो आपण आधीच रोखू शकतो.”

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक अपरीक्षित स्त्रीने गर्भधारणेच्या पहिल्या ३ महिन्यांत HPLC नावाची रक्त चाचणी करून घ्यावी. जर पती-पत्नी दोघेही carriers असतील, तर डॉक्टर्स त्यांना योग्य सल्ला व पुढील तपासणीसाठी मार्गदर्शन करू शकतात.

डॉ. जयदीप टंक यांनी सांगितले:
“Thalassemia हा टाळता येणारा आजार आहे. परंतु अनेक कुटुंबांना धोका माहितच नसतो. एक साधी screening चाचणी केल्याने carriers ओळखले जाऊ शकतात आणि योग्य वेळी निर्णय घेऊन आजार पुढच्या पिढीत जाण्यापासून रोखता येतो.”

Project MUKTA अंतर्गत २०२५ अखेरपर्यंत १० शहरांत उपक्रमाची सुरुवात होईल. तिथे डॉक्टरांसाठी Continuing Medical Education (CME) sessions घेण्यात येतील. पुढील टप्प्यात हा उपक्रम ३०+ शहरांमध्ये विस्तारला जाईल, awareness मोहिमा राबवल्या जातील आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये या विषयावर चर्चा होईल.

या उपक्रमाबद्दल डॉ. सुवर्णा खाडिलकर (Secretary General, FOGSI) म्हणाल्या:
“Project MUKTA हा एक महत्वाचा टप्पा आहे. यामुळे Thalassemia चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेषतः high prevalence असलेल्या भागांत लक्ष केंद्रित करता येईल.”

Veha Foundation च्या डायरेक्टर रुमाना हमीद यांनीही यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले:
“प्रत्येक आकड्यामागे एक बाळ, एक कुटुंब आणि एक आयुष्य आहे. आमचा उद्देश केवळ जागृती नव्हे, तर ठोस कृती करून पुढच्या पिढ्यांना या टाळता येणाऱ्या आजारापासून मुक्त करणे आहे.”

प्रारंभी ७०–८० डॉक्टरांना master trainers म्हणून प्रशिक्षण दिले जाईल. हे डॉक्टर थेट इतर डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि समाजाशी काम करतील. डॉ. पूजा लोढा (National Convenor, Project MUKTA) म्हणाल्या:
“ही guidelines Project MUKTA चा तांत्रिक पाया ठरतील. डॉक्टरांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन आपण early detection आणि prevention प्रत्येक स्त्रीच्या antenatal care चा भाग करू शकतो.”

Project MUKTA चा मुख्य संदेश असा आहे की early testing स्वस्त आणि सोपी आहे, तर Thalassemia चे आजीवन उपचार खूप खर्चिक आणि त्रासदायक आहेत. वेळेवर तपासणीमुळे आपण Thalassemia मुक्त भारत घडवू शकतो.

About FOGSI
FOGSI (Federation of Obstetric and Gynaecological Societies of India) ही देशातील ४६,००० हून अधिक स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूती तज्ञांची संघटना आहे. भारतभरातील २८६ सोसायट्यांच्या माध्यमातून FOGSI महिलांच्या आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत आहे.

About Veha Foundation
Veha Foundation गेली दोन दशके Thalassemia मुक्त भारतासाठी कार्यरत आहे. रुग्णांच्या सर्वांगीण देखभालीसह व्यवस्थापन, उपचार आणि पॅलिएटिव्ह केअर या सर्व स्तरांवर ही संस्था काम करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!