निगडीत लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
निगडी : एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (२० जानेवारी) रात्री करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश कारोटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लॉज व्यवस्थापक अस्लम इलाही शेख (२४, लातूर) याला अटक करण्यात आली असून एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
उसने पैसे मागितल्याने पिता-पुत्रास मारहाण
भोसरी : उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याची घटना बुधवारी (२१ जानेवारी) एमआयडीसी भोसरी येथे घडली.
याप्रकरणी विनायक बसप्पा कुरी (२७, चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. सलमान शेख (३३) आणि अरबाज शेख (२७, दोघे भोसरी) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या एका साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
बावधनमध्ये गावठी पिस्तूलसह तरुण अटकेत
पुणे : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री रामनगर, बावधन येथे पुणे–बेंगलोर महामार्गालगत करण्यात आली.
अनिकेत अर्जुन मंडलिक (२५, सोमेश्वरवाडी, पाषाण) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.
शिरगावात दारूभट्टीवर छापा; सहा हजार लिटर रसायन नष्ट
शिरगाव : पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे सहा हजार लिटर गूळमिश्रित कच्चे रसायन नष्ट केले. ही कारवाई बुधवारी (२१ जानेवारी) दुपारी करण्यात आली.
याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाला असून शिरगाव परंदवडी पोलीस तपास करत आहेत.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























