Homeपुणेपुण्यात ‘आकड्यांचा’ गोंधळ? वसंत मोरेंचे निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप

पुण्यात ‘आकड्यांचा’ गोंधळ? वसंत मोरेंचे निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप

पुणे २४ तास ः- पुणे महापालिका निवडणुकीनंतर निकालांइतकीच मतदानाच्या आकडेवारीची विश्वासार्हताही प्रश्नांकित ठरत आहे. ठाकरे गटाचे शहरातील नेते वसंत मोरे यांनी मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील आकडे यांत मोठा फरक असल्याचा आरोप करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

प्रभाग क्रमांक ३८ मध्ये मतदानाच्या दिवशी रात्री १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी करमरकर यांनी एकूण ७९,८२६ मतदारांनी मतदान केल्याची आकडेवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्षात केवळ ७८,७१८ मते मोजण्यात आली. म्हणजेच १,१०८ मते नेमकी कुठे गेली, असा थेट प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

हा फरक अधिक संशयास्पद ठरतो, कारण याच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३६ आणि ३७ मध्ये मात्र आधी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा मतमोजणीवेळी मतदान वाढलेले दिसून आले. मग फक्त प्रभाग ३८ मध्येच मतदान कमी कसे झाले, असा सवाल मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे याच प्रभागात त्यांना अवघ्या १,०११ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

वसंत मोरे यांनी अधिकृत आकडेवारीची प्रत सोशल मीडियावर प्रसिद्ध करत ही बाब सार्वजनिक केली आहे. “जनतेचा कौल आम्ही मान्य करतो; मात्र आकड्यांतील अशा तफावतीमुळे काही ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनीच निकाल ठरविल्याची भावना निर्माण होत आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली आहे.

या आरोपांमुळे पुण्यातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!