Homeआरोग्यराज्यात पुढील तीन दिवस वादळीवारे, मेघगर्जनेसह पाऊस

राज्यात पुढील तीन दिवस वादळीवारे, मेघगर्जनेसह पाऊस

-विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात जोर राहणार
– ओडिसा ते विदर्भापर्यत कमी दाबाचा पट्टा कार्यरत
– बंगालच्या उपसागरात चक्रीवादळासह कमी दाबाचा पट्टा
-कमाल तापमान घसरण्याची शक्यता
– विदर्भासाठी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
    वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटसह राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि  मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामाना विभागाने वर्तविला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट येण्याची शक्यता आहे.
   राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मार्च महिन्यापासून पहिल्या टप्प्यापासून उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हाच कमाल तापमानाचा पारा 41 अंशापर्यत पोहचला आहे. बुधवारी देखील राज्यात कमाल तापमानाचा पारा सर्वात अधिक ब्रम्हपुरी येथे 41.5 अंश सेल्सिअस एवढा नोंदला गेला. मात्र अवकाळी पावसाचामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या ओडिसा ते विदर्भापर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झला आहे. यामुळे मध्य ते मध्य पूर्व भागापर्यत विस्कळीत वा-यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यात कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्राच्या तुरळक भागात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस वादळी वारे, विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह हजेरी लावणार आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेश, छत्तीसगड,पश्चिम बंगाल, झारखंड,  तसेच ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू. केरळ आंध्रप्रदेशासह इतर राज्यापर्यत आहे. त्यामुळे याही भागात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे.याबरोबरच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होणार आहे. याच्याही प्रभावामुळे राज्यासह भारतातील इतर भागात अवकाळी पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे.
 —————————–
    चौकट
यलो अलर्ट :-
      भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
————————–
पावसाच्या हलक्या सरी :-
     धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, सातारा, कोल्हापूर,सांगली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!