Monday, August 24, 2026
spot_img
HomeMumbaiकामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद ; आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि...

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद ; आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार

पुणे 24 तास: – मुंबई, दि. 13 : जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

अपघातानंतर काही मिनिटांतच महावीर हॉस्पिटल, कामशेत येथे जखमींना दाखल करण्यात आले. शासनाच्या आपत्कालीन उपचार आदेश (ETI) प्रक्रियेच्या माध्यमातून तत्काळ शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आल्या. यामुळे कोणत्याही रुग्णाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचार, औषधे आणि रुग्णालयीन सेवा या सर्व सुविधा शासनाच्या सहाय्याने पूर्णपणे विनामूल्य पुरविण्यात येत आहेत.

या प्रसंगी आरोग्य विभागाने दाखवलेली संवेदनशीलता “आरोग्य हक्क — सर्वांसाठी!” या शासनाच्या ध्येयाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी ठरली आहे. शासनाच्या आरोग्य योजनांमुळे ग्रामीण आणि वारकरी समाजालाही अत्याधुनिक उपचार सेवा सहज उपलब्ध होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

महावीर हॉस्पिटल प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने समन्वयातून काम करत सर्व जखमींना तातडीने सेवा उपलब्ध करून दिली. शासनाकडून आवश्यक सुविधा, औषधांचा पुरवठा आणि सर्वतोपरी मदत पुरविण्यात आली आहे.

या घटनेतून शासनाच्या आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेबद्दलची बांधिलकी पुन्हा एकदा दृढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!