Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याप्रीपेड स्मार्ट मीटर योजना रद्द करावी: -शिवसेना, उबाठा गटाची मागणी.. महाराष्ट्र राज्य...

प्रीपेड स्मार्ट मीटर योजना रद्द करावी: -शिवसेना, उबाठा गटाची मागणी.. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

प्रिपेड, स्मार्ट वीज मीटर पुणे शहरातील ग्राहकांना नको आहे. त्यामुळे ते बसवू नये. या मागणीसाठी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या च्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
संपूर्ण देशामधे वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. विजेचे वितरण वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार आजपर्यंत होत आहे. ग्राहकाचे हित लक्षात घेऊनच हि सेवा सुरू राहणे आवश्यक आहे. परंतु वीजनियामक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रीपेड स्मार्ट मीटर योजना राबविण्याचे ठरविले आहे. या संदर्भात आदेश काढून चार पुरवठादारांना मंजुरी पत्र दिले आहेत. वीज, पाणी, पायाभूत सुविधा हे विषय सामायिक सुचित आहेत. त्यामुळे या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला स्वतंत्र आहेत.  केंद्र सरकार विजेबाबत सर्व अधिकार केंद्रित करण्याची घाई करीत आहे. व वीज वितरण कंपनीचे संपूर्ण खाजगीकरण करीत आहे. सदर स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या योजनेसाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारवर दबाव निर्माण करीत आहे. परंतु सध्याचे स्मार्ट ईव्हीएम मुळे निवडून आलेले भाजपाचे राज्य सरकार ही योजना प्रत्यक्षात उतरवणार याचे प्रमुख कारण अदानी ईलेक्ट्रीक कंपनीला जास्त नफा मिळवून देणे हा आहे. या योजनेची संकल्पना व उद्देश भाजपाच्या निकटवर्तीय कंपन्यांना कायमस्वरूपी नफा मिळवून देणारा उद्योग आहे. भाजपाचे निकटवर्तीय उद्योजक अदानी यांना 7594.45 कोटी रुपयांचा मीटर बसविण्याचा व्यवसाय आपण देत आहात. आणि हा व्यवसाय कधीही बंद होणार नाही अथवा तोट्यात जाणार नाही. कारण भारतातील प्रत्येक नागरिकाची आवश्यकता वीज आहे. त्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे एकदा अदानी ईलेक्ट्रीक कंपनीचा वीज वितरण कंपनीमध्ये चंचू प्रवेश झाला तर पूर्ण वीज वितरण कंपनी त्यांच्या मालकीची होईल व तेच करोडो वीज ग्राहकांचे मालक होतील.

अदानी ईलेक्ट्रीक कंपनीने पुणे शहरातील ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. स्मार्ट मीटर म्हणजे सध्या असलेले डिजीटल मीटर रिपेअरींगच्या नावाखाली काढून टाकायचे. प्रिपेड स्मार्ट मीटर बसवून त्यामधे चीप टाकायची आणि तो स्मार्ट मीटर ऑफिसमधे बसून कंट्रोल करायचा. या कंपन्यांना पाहिजे तेवढा नफा कमवण्यासाठी ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आकारू शकतात. याबाबत वीज ग्राहकांना तक्रार करून कुठेही दाद मागता येणार नाही. जीवनावश्यक वस्तूची खरेदी विक्रीचे अधिकार अथवा हस्तक्षेप खाजगी उद्योजकांना सरकारने देणे हे चुकीचे आहे. अशाप्रकारे खाजगी कंपनींना अधिकार देऊन भाजप सरकार या कंपनीकडून निवडणुकीसाठी प्रचंड पैसा गोळा करू शकते. अथवा पक्षासाठी इलेक्ट्रोल बाँड मिळवू शकते. अशा पद्धतीने हजारो करोड रुपयांचा कधी न संपणारा भ्रष्टाचार भाजप सरकार करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर प्रीपेड स्मार्ट मीटर या योजनेला विरोध दर्शवणार आहे. कारण ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अदानीकडे व खाजगी उद्योजकांकडे गुलाम करण्याचे मोठे षडयंत्र आहे. हे समजण्याइतके महाराष्ट्रातील वीज ग्राहक व नागरिक अडाणी नाही तर सुज्ञ आहे. आपल्या देशातील संविधानानुसार वीज पाणी पायाभूत सुविधा या नागरिकांच्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता ही सरकारची जबाबदारी आहे. अन्यथा देशातील लोकशाहीला धोका निर्माण होईल.

महाराष्ट्र शासन दि. 25 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रामध्ये 2 कोटी 25 लाख 65 हजार स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी 39 हजार 603 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी 7 ऑगस्ट 2023 रोजी 4 पुरवठादारांना मंजुरी पत्र दिले असून त्यामध्ये प्रमुख कंपनी मे अदानी ईलेक्ट्रीकल कंपनी  7594.45 कोटी, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी  3330. 53 कोटी रुपये तसेच ञ कन्स्ट्रक्शन कंपनीला वीज मीटरचे काम देण्याचा निर्णय हास्यास्पद आहे.  मे माॅटेकॉर्लो  3635.53. कोटी तर मे जीन्स या कंपनीला 2607.71 कोटींचे काम देण्यात आले आहे.

या निर्णयाने वीज ग्राहकांचा कोणताही फायदा होणार नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार जे उद्देश सांगतात ते पूर्णपणे चुकीचे आहेत. प्रीपेड स्मार्ट मीटर लावल्याने वीज बचत होईल तसेच वीज बिल वेळेत भरला जाईल. विजेचा वापर कळेल हे कारण पुढे करून या कंपनींना नफा कमवून देणे व मोठा भ्रष्टाचार करणे हाच त्यामधला भाजपच्या केंद्र सरकारचा व राज्यातील भाजप सरकारचा उद्देश आहे. सध्या सुरू असलेली वीज वितरण प्रणाली ही योग्य पद्धतीने चालू आहे त्यामध्ये विज ग्राहक विज वापर केल्यानंतर एका महिन्यात पैसे भरतात. पुणे शहरातील प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचे काम अदानी ईलेक्ट्रीकल्स कंपनीला मिळाले आहे. पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या योजनेला विरोध करीत आहे. पुणे शहरातील प्रत्येक वीज ग्राहकाचा या फसव्या योजनेला विरोध आहे. त्यामुळे सदर योजना ताबडतोब बंद करण्यात यावी. अन्यथा शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
     
याप्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अतुल गोंदकर, अनिल दामजी, राहुल जेकटे, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, प्रविण डोंगरे, पराग थोरात, हेमंत यादव, दिलीप पोमण,  ज्ञानंद कोंढरे, गणेश घोलप, अनिल जाधव,  प्रसाद चावरे, जुबेर तांबोळी, दत्ता करपे, राहुल शेडगे. सचिन चिंचवडे, दिपक कुंजीर, महिला आघाडीच्या निकीता मारटकर, पद्मा सोरटे, रोहिणी कोल्हाळ, ज्योती चांदेरे, करूणा घाडगे, स्वाती कथलकर, मनीषा गरुड, सोनाली जुनवणे, सुनिता दगडे, आनंद वाघमारे, सूरज खंडाळे, प्रवीण रणदिवे, इम्रान खान, संजय गवळी, योगेश पवार, राजाभाऊ चव्हाण, विनोद वांजळे, अजय कवडे, रमेश परदेशी, सचिन घोलप, गोविंद मिस्त्री, जुबेर शेख आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!