ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात तिरंगा ध्वजाला सलामी

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
आपल्या कामाशी प्रामाणिकपणातून देशभक्ती केली जाते. मोबाईलचा अतिरेक होऊ लागला आहे, त्याला पायबंद घालण्याची गरज आहे. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादणे योग्य नाही. मुलांचा कल आणि त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांमध्ये शैक्षणिक मूल्य रुजविण्याची गरज आहे, असे लर्निंग फेसिलिटर रोटरी क्लबच्या असिस्टंट अर्चना गोजमगुंडे यांनी सांगितले.
महात्मा फुले विद्या निकेतनच्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयामध्ये ७६ व्या प्रजासत्तादिनी राष्ट्रपतीपदक विजेते सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ वाकसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून सलामी देण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. अशोक बालगुडे, मंदाकिनी वाकसे, महेश ससाणे, संजय शिंदे, शीतल शिंदे, महेश ससाणे, प्राचार्या उज्ज्वला सावंत, मुख्याध्यापक अजिनाथ चव्हाण, प्राचार्या कल्पना त्रिपाठी, कल्पना लूक, शुभांगी डावखरे, रेश्मा सातपुते, शिक्षकवृंद, पालक-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी थोर नेत्यांच्या पोषाखात घोषवाक्य सादर केली. कनिष्ठ महाविद्यालय आणि डीटीएडच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य आणि समूहगीत सादर केले.
प्राचार्य रवींद्र वाघ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गुणवाढीबरोबर गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थोर नेत्यांची चरित्रे अभ्यासून त्यांचे गुण अंगिकारले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ आणि पर्यवेक्षक अभय पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आनंदकुमार धालपे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब शिंगाडे यांनी आभार मानले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























