Friday, August 21, 2026
spot_img

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे आज पुण्यात अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे २४ तास-बजाज पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत आज आणि शुक्रवार, २३ जानेवारी रोजी मोठे बदल करण्यात आले असून, स्पर्धा मार्गावरील अनेक रस्ते काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही स्पर्धा १९ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. शहरातून स्टेज २ आणि स्टेज ४ हे दोन टप्पे जाणार असून, त्या अनुषंगाने संबंधित मार्गांवरील वाहतूक काही काळ वाहनविरहित व मनुष्यविरहित ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.

स्टेज ४ (२३ जानेवारी)
शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बाणेर, पाषाण, पुणे विद्यापीठ परिसर, एस.बी. रोड, कर्वे रोड, सिंहगड रोड, लक्ष्मी रोड, कॅम्प, डेक्कन आणि बालगंधर्व चौक परिसरातील वाहतुकीत बदल लागू राहणार आहेत. काही रस्ते पूर्णतः बंद, तर काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या सूचना
किराड चौक ते इस्कॉन मंदिर दरम्यानचा मार्ग आज सकाळी ७ वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. स्टेज २ आणि स्टेज ४ च्या संपूर्ण मार्गावर स्पर्धेच्या कालावधीत ‘नो-पार्किंग झोन’ लागू राहील. तसेच या दोन दिवसांत पुणे शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.

रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने आणि स्पर्धेशी संबंधित वाहनांना मात्र सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि स्वयंसेवक व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!