Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याधरणातील धरणातील  गाळ : सरकारे बदलतात, गाळ मात्र साचत राहतो

धरणातील धरणातील  गाळ : सरकारे बदलतात, गाळ मात्र साचत राहतो

डॉ. अशोक बालगुडे, ज्येष्ठ पत्रकार

पुणे 24 तास :-

देशात पाणीटंचाई आहे, हे अर्धसत्य आहे. खरे संकट पावसाचे नसून, धरणांच्या पोटात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाचे आहे. पाणी साठवण्याची क्षमता आपणच गमावली आहे. तरीही आपण नव्या धरणांची स्वप्ने पाहतो, जुन्या धरणांकडे पाठ फिरवतो.

कर्नल सुरेश पाटील यांनी निवृत्तीनंतर जीवनाच्या सेकंड इनिंगमध्ये खडकवासला धरणाचे पुनर्जीवन करण्याचे ठरविले.

खडकवासला धरणात गेल्या २५ वर्षांत जे घडले, ते धोरणकर्त्यांना अस्वस्थ करणारे आहे. निवृत्त कर्नल पाटील यांनी लोकसहभागातून, पर्यावरणाशी संगत (अंदाजे ३५ लाख वृक्षरोपण) करून धरणातील गाळ काढण्याचा मार्ग दाखवला व घरणातील पाणीसाठवण क्षमता ३० टक्क्यांनी वाढविली. आणि पुणे शहरासह २५–३० गावांना स्थिर पाणीपुरवठा व धरणातील काढलेली सुपिक माती (गाळ) मोफत देऊ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीउत्पन्न दुप्पटीने वाढले. रासायनिक खते व युरिया वापरण्याची गरज पडली नाही. धरणातील गाळाला शेतकरी काळं सोनं म्हणतात. रासायनिक खतांमुळे नापीक झालेलल्या जमिनी धरणातील गाळामुळे पुन्हा जिवंत झाल्या. हा अनुभव खडकवासल्याच्या काठावर असलेल्या २८ गावांमध्ये दिसतो. शासन दरवर्षी हजारो कोटी रुपये युरिया व रासायनिक खतांवर खर्च करते. महाराष्ट्रातील ५०० धरणे गाळमुक्त केली, तर २५० नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि त्यातून ७०–८० हजार कोटी रुपयांची खत सबसिडी वाचू शकते, असे कर्नल पाटील ठामपणे सांगतात. सबसिडीमधून वाचलेला निधी आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरता येऊ शकेल.

CSR:उद्योगांनी करून दाखविले

खडकवासला प्रकल्पाला आर्थिक बळ मिळाले ते CSRच्या माध्यमातून. हिंदुजा फाउंडेशन, कमिन्स इंडिया फाउंडेशन, फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन, टाटा मोटर्स यांसारख्या संस्थांनी निधी, यंत्रणा देऊ केली. खडकवासला धरण प्रकल्प देशासाठी एक रोल मॉडेल म्हणून गाजत आहे. या प्रकल्पाचे कौतुक जगभर होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांना आपण रात्री-अपरात्री एक ते दीड तास वीज देतो. वास्तविक शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा केला पाहिजे. पण तसे का होत नाही, याचा विचार केला, तर धरणातून वीज निर्मिती कमी प्रमाणात होते. कारण धरणात वीजनिर्मितीसाठी लागणारे पाणी कमी व गाळ जास्त असल्यामुळे अत्यल्प वीज निर्मिती होते. त्यामुळे म्हणून शेतकऱ्यांना २४ तास वीज देता येत नाही. पण धरणात पाणी का नाही, याचे उत्तर कोणी देत नाही. पाण्याऐवजी गाळ आहे. गाळ काढला, तर पाणी वाढते. एक ट्रक गाळ बाहेर काढला, तर एक टँकर पाणी साठवण क्षमता वाढते. हे गणित राजकारणापेक्षा विज्ञानाचे आहे.

राज्यकर्त्यांसाठी अस्वस्थ करणारा प्रश्न

निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधून हा मुद्दा स्पष्टपणे मांडला. पुणे जिल्ह्यातील २५ धरणे येऊ घातलेल्या उन्हाळ्यामध्ये लोकसहभागातून शेतकऱ्यांच्या पुढाकाराने स्वच्छ केली तर, पुणे जिल्ह्यात १२ नवीन धरणे बांधल्याचा फायदा होईल. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा ऑर्गेनिक फार्मिगवर जाईल व पुणे जिल्ह्याचे शेतीउत्पन्न दुप्पट व तिप्पटीने वाढेल. त्याचा आर्थिक लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल, असे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी निक्षून सांगितले.

“रासायनिक खतांमुळे नापीक झालेली माझी जमीन धरणातील गाळामुळे पुन्हा सुपीक होत आहे.”

— अंकुश जावळकर, शेतकरी, खानापूर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!