Friday, August 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यामहिला दिनानिमित्त विधिमंडळातील चर्चेत पर्यावरण मंत्र्यांनी मांडल्या मनातील भावना

महिला दिनानिमित्त विधिमंडळातील चर्चेत पर्यावरण मंत्र्यांनी मांडल्या मनातील भावना

स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासन करतेय : मंत्री पंकजा मुंडे
पुणे  (पुणे 24 तास ब्युरो )

शासनाच्या योजना ह्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी असायला हव्यात. स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासनाने केले असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात आयोजित विशेष चर्चेत सहभाग घेताना मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला शक्ती विषयी गौरवोद्गार काढून स्त्रीच्या महानतेची, तिच्या सहनशीलतेची गाथाच आपल्या भाषणातून व्यक्त केली.
मुली, महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगविषयी चिंता व्यक्त करून श्रीमती मुंडे म्हणाल्या की, मुलींना कर्करोगापासून वाचविण्यासाठी त्यांना शासनामार्फत लस देण्याचे प्रयोजन केले तर त्यांना कर्करोगाच्या धोक्यापासून वाचवू शकू.

महिलांनी स्वतः कमवायला पाहिजे, यासाठी त्यांना शिक्षण गरजेचे आहे. शासनाच्या योजना सशक्त मातांसाठी आहे, तथापि, सशक्त माता बरोबर त्या सशक्त मनुष्य व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

स्त्रियांच्या ताकदीची महती सांगून मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, आम्ही स्त्रिया या खूप कठीण परिस्थितीला सामोरे जायला तयार झालेल्या आहोत.
स्त्रिया कठीण परिस्थितीला सक्षमपणे तोंड देतात.
त्या स्पष्ट बोलतात, राजकारणात डावपेच कमी खेळतात
स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर ती आत्मनिर्भर राहू शकते. शिक्षण आणि पोषण हे स्त्री सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे घटक आहेत. महिलांनी कधीही घेतलेले कर्ज बुडवलेले नाही; त्यामुळे आर्थिक व्यवहारात त्यांचा सहभाग वाढवावा. महिला बचतगटांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक योगदान दिले आहे.त्यांना कमी व्याजदरात कर्ज दिल्यास त्या उत्तम व्यवस्थापन करू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महिला आरक्षणा व महिला सुरक्षा विषयावर मंत्री श्रीमती पंकजा मुंडे म्हणाल्या की, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळाले आहे. आता राजकीय क्षेत्रात अधिकाधिक महिलांचा सहभाग वाढायला हवा. महिलांना केवळ मदत मिळवणाऱ्या नव्हे, तर सक्षम नागरिक म्हणून उभे करणे गरजेचे असून त्यांचे मानसिक आणि सामाजिक सक्षमीकरण होणे आवश्यक. त्याच बरोबर महिलांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. महिलां विषयीच्या सायबर गुन्हे, अन्याय, शोषण यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला त्याबद्दल त्यांचे आभार ही मंत्री महोदयांनी व्यक्त केल्या.
जलयुक्त शिवार ही स्त्रियांच्या डोक्यावरील घागर काढण्यासाठी झाला. त्यामुळे शासनाच्या योजनाचा जास्तीत जास्त लाभ महिलांना मिळावा, यासाठी मी ग्राम विकास मंत्री असताना प्रयत्न केले. मंत्री पदाच्या काळात अंगणवाडीच्या माध्यमातून महिलांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्त्रियांचा सन्मान, त्यांची आर्थिक आणि सामाजिक सक्षमता, शिक्षण, पोषण, आरक्षण, आणि सुरक्षा हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत. समाजाच्या आणि शासनाच्या मदतीने महिला सक्षम होऊ शकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!