पुणे : (पुणे २४ तास)
‘सृजन परंपरा ‘प्रस्तुत ‘पंढरीचा स्वामी’ या भक्तिरचनांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन राजलक्ष्मी कलादर्शन सभागृह(डी.पी.रोड, कोथरूड) येथे रविवार, दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले आहे.संगीतकार आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांचा हा कार्यक्रम असून युवा गायक मेहेर परळीकर,श्रुती विश्वकर्मा मराठे हे या रचना सादर करतील.अरविंद आगाशे,डॉ.संगीता गोडबोले,रेवा लिमये यांच्या काव्यरचना सादर केल्या जाणार आहेत.त्यांना अथर्व कुलकर्णी(संवादिनी),अनुप कुलथे(व्हायोलिन),आदित्य आपटे(तालवाद्ये),जगमित्र लिंगाडे(तबला),कृष्णा साळुंखे (पखवाज)यांची साथ संगत असणार आहे.निवेदन स्नेहल दामले यांचे आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विवेक पाध्ये,सुलभा तेरणीकर,आशुतोष कुलकर्णी यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























