Friday, August 14, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षकांचा खरा ध्यास – डॉ. लीना बोरुडे

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षकांचा खरा ध्यास – डॉ. लीना बोरुडे

पुणे २४ तासः- विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवताना केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण अपुरे असून त्यांच्या मानसिक, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीसाठी शिक्षकांनी प्रामाणिक भूमिका घ्यावी लागते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षकांचा खरा ध्यास असतो, असे स्पष्ट आणि परखड मत डॉ. लीना बोरुडे यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले विद्या निकेतन संस्था व बचपन वर्ल्ड फोरम, बचपन बचाओ समितीच्या घरटं प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन कार्यक्रमात डॉ. लीना बोरुडे बोलत होत्या. याप्रसंगी रोटरी क्लब सारसपागचे अध्यक्ष आशुतोष वैद्य, जेजुरी मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, मिलिंद गरगटे, सुधीर सुंठणकर, नितीन खिरीड, सचिन शिंदे, अर्चना गोजमगुंडे, मनिषा राऊत, डॉ. लीना बोरुडे, गरिमा कवठेकर, सरिता चितोडकर, मनिषा खेडेकर, डॉ. स्वप्ना डांगमाळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजली व्हर्टी, मदनलाल दर्डा, जयंत भोसेकर, नगरसेवक संदीप बेलदरे, पल्लवी आबनावे, सरपंच नाझीर पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी भागंडा, विविध नृत्यप्रकार, ‘मेरा नाम चिन चिन चू’, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नृत्य-नाटिका, आदिवासी व कोळी नृत्य, देशभक्तीपर गीतांवरील नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त व कलागुण ठळकपणे दिसून आले. तसेच, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘२०२६ स्त्री-शक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

डॉ. बोरुडे म्हणाल्या की, “स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि समाजाबद्दलची बांधिलकी विकसित होते. पालक, शिक्षक आणि शिक्षणसंस्था यांनी एकत्र येऊन मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले विद्या निकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी, अध्यक्षा स्मिता वाघ, सचिव-प्राचार्य रवीद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय एकात्मता महासंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

टिंबर मार्केट कचऱ्याच्या विळख्यात; स्वच्छतेचा दावा फक्त कागदावर?

0
कचरा वेळेवर उचलण्यात यावा, परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुणे : टिंबर मार्केट परिसरात...

error: Content is protected !!