Homeताज्या बातम्याअग्निशिखा ' ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास...

अग्निशिखा ‘ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

सुषमा स्वराज अभ्यासू , व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून खूप मोठे काम केले आहे. त्या भारतीय राजकारणाला पडलेले स्वप्न आहेत. ‘ अग्निशिखा : सुषमा स्वराज’ या ई आणि ऑडिओ बुकच्या माध्यमातून त्यांचे कार्य, जीवन प्रवास निश्चितच पुढच्या पिढीपर्यंत जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मेघदूत निवासस्थानी अग्निशिखा ऑडिओ व ई-बुकच्या प्रकाशनप्रसंगी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना पासपोर्ट आणि व्हिसा बाबत अनेक पद्धती लागू केल्या. अनेक देशांशी त्यांनी केलेल्या करारांमुळे आज आपल्याला त्या देशांचा व्हिसा मिळत आहे. त्यांनी केलेल्या ‘रिफॉर्म’मुळे आज पासपोर्ट मिळणे सोपे झाले आहे. लोकसभेत विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी तत्कालीन सरकारच्या कारभारावर केलेले अभ्यासपूर्ण विवेचन त्याकाळी खूप गाजले. त्यांचा व्यासंग, विषयाची हाताळणी, प्रचंड बुद्धिमत्तेसोबत असलेली स्मरणशक्ती ही त्यांची ओळख द्यायला पुरेशी आहे.
त्यांचा विविध भाषांचा अभ्यास, त्यांच्यामध्ये भाषेचे असलेले सौंदर्य ओळखण्याची विशेष कला होती. सुषमा स्वराज कधीही बोलताना समोर कागद ठेवत नव्हत्या. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही मार्गदर्शक ठरत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा स्वराज यांच्या कार्याचा गौरव केला.

मेधा किरीट लिखित पुस्तकाचे ऑडिओ बुक व ई-बुक प्रकाशन मराठीसह हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमातून पुस्तकाची निर्मिती झंकार स्टुडिओ, पुणे येथे झाली आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार किरीट सोमय्या, मराठी अभिवाचक तनुजा राहणे, ईबुक पुस्तक रचनाकार स्वाती जोशी, हिंदी अभिवाचक दिव्या शारदा, झंकार चे संचालक सत्यजित पंगू आणि आनंद लिमये उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!