Homeउद्योगकोंढवा, पिसोळीतील दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी

कोंढवा, पिसोळीतील दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी

२२ केव्हीच्या दोन नवीन वीजवाहिन्या कार्यान्वित

पुणे  (पुणे  24 तास ब्युरो )

  कोंढवा, पिसोळी परिसरातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या दोन नवीन २२ केव्ही वीजवाहिन्या मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते कार्यान्वित करण्यात आल्या. या नवीन वीजवाहिन्यांमुळे ४१ हजार ९०० वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे.

बिबवेवाडी येथील १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या आरती २२ केव्ही औद्योगिक वीजवाहिनीचे तसेच ब्रम्हा २२ केव्ही वीजवाहिनी उभारण्याचे काम पूर्ण झाले. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते या दोन्ही नवीन वीजवाहिन्या नुकत्याच कार्यान्वित करण्यात आल्या. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता श्री. चंद्रकांत दिघे, श्रीमती वर्षा बोरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र भुजबळ, सहायक अभियंता श्री. श्रीकांत अवचार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आरती २२ केव्ही औद्योगिक वीजवाहिनीमुळे कुमार पाम २२ केव्ही वीजवाहिनी व शोभा उपकेंद्राचा वीजभार कमी झाला आहे. आरती वीजवाहिनीद्वारे पुण्यधाम आश्रम रोड, टायनी औद्योगिक परिसर, पिसोळी रस्ता परिसरातील १८ हजार ९०० औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठ्याचा थेट फायदा होईल.

कोंढवा परिसराला ब्रम्हा स्विचिंग स्टेशनमधून वीजपुरवठा केला जातो. या स्विचिंग स्टेशनला वीजपुरवठा करण्यासाठी ब्रम्हा २२ केव्ही वीजवाहिनीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे कोंढवा, भाग्योदय नगर, शिवनेरी, कुबा मस्जिद परिसर, वाघजई आदी परिसरातील २३ हजार वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होईल. सोबतच ब्रम्हा स्विचिंग स्टेशनला नव्या वीजवाहिनीमुळे पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!