Homeताज्या बातम्याविद्यार्थ्यांनीच उभारले ज्ञानाचे रंगमंच ः सूर्यवंशी

विद्यार्थ्यांनीच उभारले ज्ञानाचे रंगमंच ः सूर्यवंशी

पुणे ः विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकवृंदांकडून ज्ञानदान अविरत सुरू असते. त्यातून “विद्यार्थी केवळ ऐकणारे नव्हे तर स्वतःच्या अनुभवातून शिकणारे झाले, तर शिक्षण खऱ्या अर्थाने समृद्ध होते,” असे मत जि.प. प्राथमिक शाळा पेठ (ता. हवेली) केंद्र सोरतापवाडीचे मुख्याध्यापक लक्ष्मण सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ केंद्र सोरतापवाडी (ता. हवेली) पुणे येथे शाळेच्या स्टेजवर ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन साहित्य प्रदर्शन व कृती उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख आशालता कटके, पदवीधर शिक्षक : राजेंद्र कुंभारकर, शिक्षक : सचिन साकोळकर, वैशाली आठवले, आरिफा शेख, तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित कृती साहित्य, शब्दकोडी, शब्दडोंगर, पाढे तयार करणे, बहुपयोगी अध्ययन साहित्य- “एक शब्द – अनेक वाक्ये”, दशमान परिमाणे यावरील उपक्रम तसेच, मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी स्वतः साहित्य वापरून स्व-अध्ययन अशा उपक्रमात विद्यार्थी रममान झाले होते. तसेच, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या साहित्याच्या माध्यमातून गणित व भाषा विषयातील संकल्पना सहज समजून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी ज्ञानरचनावादाचा वापर करून मॅडमला पाढे तयार करून प्रत्यक्ष सादरीकरण करून दाखवले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीला चालना देणारा व ज्ञाननिर्मितीचा आदर्श नमुना ठरला असून पालक व शिक्षकांकडूनही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करण्यात आले.

सूर्यवंशी म्हणाले की, ज्ञानरचनावादावर आधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व स्व-अध्ययनाची सवय निर्माण होत आहे, ही समाधानची बाब आहे. शाळा अभ्यासपूर्ण व आनंददायी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थी-पालक दोघांचेही शैक्षणिक प्रबोधन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!