जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक
उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख
पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या जैन वधूवर परिचय संस्था, पुणे तर्फे ४ जुलै २०२६ रोजी समाजातील वाढत्या समस्या व उपायांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली…
बैठकीचा मुख्य विषय होता – “आपण सगळे एकच आहोत” व “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?”
बैठकीतील ठळक मुद्दे
संस्थेचे अध्यक्ष मुकेशजी शहा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून समाजातील समस्या, त्यांची कारणे आणि उपायांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष विवेक गुजर व दिलीपजी मेहता यांनी संस्थेच्या योजनांची माहिती दिली. अनिल वखारिया यांनी चर्चेचा सारांश मांडला. बैठकीत संस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल आणि युवक व कुटुंबांना जोडण्यासाठी काम करेल, असा संकल्प करण्यात आला.
चर्चेत आलेल्या प्रमुख समस्यामध्ये युवक-युवतींच्या विवाहाचे वय वाढणे, कुटुंबातील मुलांची संख्या कमी होणे, उच्च शिक्षण आणि करियरला अधिक प्राधान्य, अपेक्षांचा वाढता स्तर, युवकांमधील व्यसनाधीनता, एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन, घटस्फोटांच्या प्रमाणात वाढ, मुलांमध्ये जैन संस्कारांचा अभाव आणि सोशल मीडियाचा प्रभाव
यावेळी अचल जैन, पृथ्वीराज धोका, राजेंद्रजी सुराणा, दिपकजी शहा, धनराजजी चौहान, विरेनभाई शहा, बाळासाहेब धोका, विलासजी बाफना, संपत गदिया, महावीर सुराणा, समीर जैन, सुनील कटारिया, लकीशा मरलेचा, अॅड. रुपल चोरडिया व “पुढारी” चे पत्रकार अनिल दाहोत्रे उपस्थित होते. जयराज भवनचे विश्वस्त अनिल शहा, कार्याध्यक्ष सुनील शहा यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून दिले. आभार भावेशजी शहा सचिव यांनी मानले.
यावेळी महत्वाची घोषणा करण्यात आली ऑनलाईन मॅट्रिमोनियल व संमेलन जैन वधूवर परिचय संस्थेतर्फे १९ जुलै २०२६ रोजी जैन बायोडेटा मॅट्रिमोनियल वेबसाईटचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी ऑनलाईन परिचय संमेलनही होणार आहे. याकरिता नोंदणी तपशील पूढील प्रमाणे संमेलन दि. रविवार, १९ जुलै २०२६ असून नोंदणी १७ जून पासून फक्त ऑनलाईन सुरु आहे
नोंदणी शुल्क रु १५५० असून वधू-वर पुस्तिका व एक वर्ष मॅट्रिमोनियल सदस्यता असेल. रु १००० मेळ्यात सहभाग व मोफत पुस्तिका रु ५०० आहे. नोंदणी अंतिम दिनांक १० जुलै २०२६ पर्यंत स्वीकारले जातील. ऑनलाईन नोंदणी https://jainvadhuvarsansthapune.com या वेबसाईट वर होईल. या अडचण आल्यास
मुकेश शहा अध्यक्ष – 9028205011
भावेश शहा सचिव – 9371018731
तांत्रिक मदत: आशिष मेहता – 9822477450, सुनील जैन – 8275756363, कार्यालय –992342345 यांना करावा असे कळविण्यात आले.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























