Homeताज्या बातम्यायेरवडा कारागृहात अभंग वारी ‘ कार्यक्रम; ५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग

येरवडा कारागृहात अभंग वारी ‘ कार्यक्रम; ५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असते – कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ

पुणे : कारागृहातील बंद्यांच्या मानसिक स्वास्थ्याला चालना देत त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने येरवडा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी (१७ जुलै) ‘अभंग वाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ५०० बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून आर के स्मृती बहुउद्देशीय संस्था पुणे, ऋषीआनंद वन – हडपसर, व सुकांता थाळी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात ओंकार लोहार आणि गायत्री कुंडेकर यांनी अभंग भजने तसेच टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिरसपूर्ण सादरीकरण करून उपस्थित बंद्यांना मंत्रमुग्ध केले.  यावेळी संस्थेचे संस्थापक आनंद साळुंखे, सचिव भाग्यश्री साळुंखे, विजयकुमार मर्लेचा, प्रमोद छाजेड आणि खास प्रमुख अतिथी म्हणुन राज्य विधिमंडळाचे ग्रंथ विभागाचे मुख्य अधिकारी बाबासाहेब वाघमारे उपस्थित होते.

आयुष्यात केलेल्या चुकांमुळे बंदिवानाचे जीवन वाट्याला आले असले तरी अभंगवाणी कार्यक्रमाच्या रूपाने साक्षात विठ्ठलाचा गजर तुरुंगाच्या भिंतीच्या आत घुमल्यामुळे पुढे कैद्याच्या आयुष्यात सकारात्मक घडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला..

कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ यांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे बंद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्या मानसिक आरोग्यास बळकटी मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) डॉ. सुहास वारके यांच्या संकल्पनेतून आणि विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी अति. अधीक्षक पल्लवी पी कदम, उपअधीक्षक आर. ई गायकवाड, वरीष्ठ तुरुंगाधिकारी  एस आर पाटील, शिक्षक  एन आर शिंदे,शिक्षक  जी. व्ही. तागड तसेच इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहीले.

मानवी मनाला स्पर्श करणारा उपक्रम 

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी वेळ असते, जेव्हा ती स्वतःच्या चुकांचा विचार करते. अशा वेळी उपदेशापेक्षा संस्कार, संगीत आणि अध्यात्म अधिक प्रभावी ठरतात. येरवडा कारागृहातील हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सादरीकरण नव्हता, तर बंदिवानांच्या मनात आशा, आत्मपरीक्षण आणि नव्या आयुष्याची प्रेरणा जागविण्याचा एक प्रयत्न होता. तुरुंगाच्या उंच भिंतींच्या आत घुमलेला विठ्ठल नामाचा गजर अनेकांसाठी कदाचित नव्या जीवनप्रवासाची सुरुवात ठरू शकतो.  सर्व उपस्थित बंद्यांच्या एक मुखाने विठ्ठलाचा गजर केला जो मनाने विठ्ठला पर्यंत पोहोचला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!