Monday, August 24, 2026
spot_img
HomeMumbaiधर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

धर्म बदलला तरी जात बदलत नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या ‘वाणी’ समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची मूळ जात बदलत नाही.

पुणे- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, केवळ धर्मपरिवर्तन किंवा धार्मिक आचरण बदलल्यामुळे व्यक्तीची जन्मजात जात बदलत नाही. हा निर्णय भविष्यातील जातवैधता प्रमाणपत्राशी संबंधित प्रकरणांसाठी मार्गदर्शक ठरण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण अमरावती येथील २० वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनी प्राची सुधीर नेटके यांच्या याचिकेशी संबंधित आहे. त्यांनी ‘वाणी’ या इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, शाळा सोडल्याच्या दाखल्यात जात ‘सैतवाल जैन’ अशी नोंद असल्याचे कारण देत विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तसेच ‘जैन वाणी’ हा समाज राज्याच्या OBC यादीत नसल्याचाही मुद्दा समितीने मांडला होता.

या निर्णयाविरोधात प्राची नेटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी करत समितीचा आदेश रद्द केला.

न्यायालयाने नमूद केले की, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्राची नेटके यांचे कुटुंब पारंपरिकरित्या ‘वाणी’ समाजाशी संबंधित आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला असला तरी त्यामुळे त्यांची मूळ जात बदलत नाही. धर्म आणि जात या स्वतंत्र संकल्पना असून धार्मिक श्रद्धा किंवा आचरण बदलल्याने जन्मजात सामाजिक ओळख बदलत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्व पुरावे आणि नोंदींचा विचार करून न्यायालयाने संबंधित जात पडताळणी समितीला प्राची नेटके यांना ‘वाणी’ समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र चार आठवड्यांच्या आत जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!