कचरा वेळेवर उचलण्यात यावा, परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे : टिंबर मार्केट परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले असून दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे.
रस्त्याच्या कडेला तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे डास, माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टिंबर मार्केट हा सतत वर्दळीचा परिसर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिक, व्यापारी आणि वाहनांची ये-जा असते. मात्र, कचऱ्याच्या समस्येमुळे परिसराच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कचरा वेळेवर उचलण्यात यावा, परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन टिंबर मार्केट परिसर स्वच्छ करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















