Homeताज्या बातम्यागंज पेठ येथील लहुजी वस्ताद यांची तालीम पुणे मनपाच्या ऐतिहासिक वास्तूच्या यादीत...

गंज पेठ येथील लहुजी वस्ताद यांची तालीम पुणे मनपाच्या ऐतिहासिक वास्तूच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी मनसे व क्रांती सेनेच्या वतीने निवेदन

पुणे 24 तास:- देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे लहुजी वस्तादांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये गंज पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले.या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू , क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी वस्ताद साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

अशा ऐतिहासिक वास्तूस पुणे महानगरपालिकेच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व क्रांतिवीर सेनेच्या वतीने दिनांक 2 डिसेंबर रोजी पुणे मनपा आयुक्त  नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व क्रांतिवीर सेनेचे मनोज क्षीरसागर, तेजस माने, प्रविण क्षीरसागर, अभिषेक गोळे, यशवंत कसबे, रोनित वाघमारे, भोला माने ,राकेश जाधव, विनायक साबळे आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पाठपुरावा करणारे कार्यकर्ते अभिषेक गोळे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

error: Content is protected !!