Saturday, August 22, 2026
spot_img
Homeआरोग्यभूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक महिन्यांपासून भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाचा प्रस्ताव प्रलंबित होता. पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत आज हा प्रस्ताव चर्चेला आला.

पुणे : उरुळी देवाची येते असलेला भूमीग्रीन कंपनीचा कचरा प्रकल्प नूतनीकरणासाठी बंद करण्यात येत आहे. म्हणूनच पुढील ९ महिन्यांसाठी भूमीग्रीन कंपनीला सध्या उरुळी देवाची येथे अस्तित्वात असलेल्या कचरा डेपोच्या शेजारची जागा तात्पुरत्या स्वरूपात देण्याबाबत हा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. या प्रस्तावाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. अखेरीस ९ विरुद्ध ४ असा हा प्रस्ताव मंजूर झाला.

याबाबत स्थायी समितीचे सदस्य व काँग्रेस पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. “मुळातच पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून भूमीग्रीन कंपनीला झुकते माप देण्यात येत आहे. या प्रकल्पाला सध्याच्या कचरा प्रकल्पासाठीही वाढीव दर देण्यात येत आहे. जुन्या प्रकल्पाचे नूतनीकरण होईपर्यंत नवीन तात्पुरत्या प्रकल्पासाठी भूमीग्रीन कंपनीकडून शेड उभारले जातील, नवीन मशिनरी घेतली जाईल आणि कालांतराने याच जागेत नवीन कचरा प्रकल्पाचे काम आपसुकच भूमीग्रीन कंपनीला दिले जाईल अशी आमची शंका नव्हे, तर खात्री आहे. भूमीग्रीन कंपनीचा प्रकल्प नूतनीकरणासाठी जर काही महिने बंद राहणार असेल, तर भूमीग्रीन कंपनी सोडून सध्या पुणे महानगरपालिकेसोबत काम करणाऱ्या इतर कंपन्या वाढीव कचरा उचलण्यासाठी तयार आहेत, तशी मागणी करणारी पत्रेही अनेक कंपन्यांनी मनपा प्रशासनाला दिली आहेत. तरीही भूमीग्रीन कंपनीलाच पर्यायी जागा देण्याचे औदार्य महानगरपालिका प्रशासन का दाखवत आहे ? हा मुख्य प्रश्न आहे. एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या प्रस्तावाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैशाली बनकर, अमोल बालवडकर, सुहास टिंगरे यांनी मतदान केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!