Monday, August 24, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुण्यात घुमली "छात्रों की गुंज"

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च !

पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि विद्यार्थ्यांच्या भावनांचा कडेलोट झाला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या, शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा इतकी साधी विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र सत्तेच्या मग्रुरीत असलेल्या मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. शेतकऱ्यांचं आंदोलन जसं पोलिस बळाचा वापर करून चिरडून टाकलं तसंच विद्यार्थ्यांचं आंदोलनही चिरडून टाकू अशी हवा मोदी सरकारच्या डोक्यात होती. मात्र, विद्यार्थ्यांनी देशव्यापी संघर्ष उभा केला, काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी “छात्रों की गुंज” या देशव्यापी मोहिमेतून जी क्रांतीची मशाल पेटवली आणि या क्रांतीच्या शक्तिपुढे मग्रूर मोदी सरकारला झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि जवळपास २८ दिवसांच्या संघर्षाला यश आले.

मात्र, या २८ दिवसांत एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली. “धर्मेंद्र प्रधान” हा प्रश्न खूप छोटा असून, मोदी सरकारचा अहंकार हा मुख्य प्रश्न म्हणून पुढे आले. मोदी सरकारने विद्यार्थ्यांवर पोलिसांचे बळ वापरले, मोर्चात भाजपाचे गुंड घुसवले, विद्यार्थ्यांवर टिअर गॅसचा, पॅलेट गनचा वापर केला, भाजपच्या मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधले, त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याची उघड धमकी दिली… हे चित्र पाहून मोदी सरकारचा अहंकार हा सर्वांत मोठा प्रश्न आहे ही बाब समोर आली. सरकारचा हा अहंकार मोडून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या मोर्चाची हाक काँग्रेस पक्षाने दिली असली, तरीही मोर्चात कोणत्याच पक्षाचा राजकीय झेंडा दिसला नाही, कोणतीही राजकीय घोषणाबाजी झाली नाही, केवळ देशातील तरुणाईच्या न्यायासाठी तिरंगा राष्ट्रध्वज हातात घेऊन हजारो पुणेकर या मोर्चात सहभागी झाले.

मोदी सरकारने विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष हल्ल्याबाबत जाहीर माफी मागावी, आंदोलक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी त्यांच्यावर नोंदवलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, आत्महत्या केलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या कॅन्डल मार्चला तमाम पुणेकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.

या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम, ज्येष्ठ नेते गोपाल तिवारी, रफिक शेख, साहिल केदारी, सुनील शिंदे, शिवा मंत्री, विशाल मलके, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, दिपाली डोख, सौरव अमराळे, अभिजीत गोरे, पुष्कर आबनावे, अक्षय जैन, स्वाती शिंदे यांच्यासह पुणे शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोंच्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!