Saturday, August 22, 2026
spot_img
Homeक्रीडावडील-मुलीची २२० किमीची सायकल वारी; पंढरपुरात एआय जनजागृतीचाही संदेश

वडील-मुलीची २२० किमीची सायकल वारी; पंढरपुरात एआय जनजागृतीचाही संदेश

वडील आणि मुलीचा अनोखा उपक्रम

पंढरपूर, १९ जुलै : पुण्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षक व शिक्षणतज्ज्ञ राहूल शहा आणि त्यांची १६ वर्षीय कन्या अनेरी शहा यांनी सुमारे २२० किलोमीटरची दोन दिवसांची ‘फादर-डॉटर सायकल वारी’ यशस्वीरित्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, ही राहूल शहा यांची सातवी सायकल वारी असून वडील आणि मुलीने एकत्र केलेली ही त्यांची पहिलीच पंढरपूर सायकल वारी ठरली.

अनेरीने वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी आपली पहिली सायकल वारी पूर्ण केली होती. त्यानंतर तिने भारतातील अनेक ठिकाणी सायकल भटकंती केली असून, सायकलवरून नवीन ठिकाणे, संस्कृती आणि माणसं अनुभवण्याची तिला विशेष आवड आहे. साहस, प्रवास आणि निसर्गाशी जवळीक हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे यंदाची वडील-मुलीची पंढरपूर सायकल वारी तिच्यासाठी आणखी एक अविस्मरणीय अनुभव ठरली.

या सायकल वारीची सुरुवात १६ जुलै २०२६ रोजी पुण्यातून झाली आणि १७ जुलै २०२६ रोजी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाने या प्रवासाची सांगता झाली. पहिल्या दिवसाचा प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यांनी फलटण येथे राहूल शहा यांचे मामा श्री. माणिकांत शहा यांच्या घरी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केले.

ही वारी केवळ आध्यात्मिक नव्हती, तर सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारीही होती. पंढरपुरात पोहोचल्यानंतर राहूल शहा यांनी रेल्वे लाईनजवळील डी. एच. के. स्कूल, पंढरपूर येथे सुमारे ५० शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) जनजागृती सत्र घेतले. या सत्रामध्ये शिक्षण क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर, अध्यापनातील नवे प्रयोग आणि भविष्यातील शिक्षणाची दिशा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

प्रवासादरम्यान सुपा येथे सायकलच्या डिस्क ब्रेकमध्ये बिघाड झाला. मात्र, पंढरपूर वारीसाठी निघाल्याचे समजताच स्थानिक सायकल दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीने कोणतेही शुल्क न घेता सायकल दुरुस्त करून दिली. तसेच मार्गातील एका सेंद्रिय ड्रॅगन फ्रूट शेताला भेट देत स्थानिक महिला शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही त्यांना मिळाली. या प्रवासात अनेक अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या मदतीमुळे आणि आत्मीयतेमुळे “वारी म्हणजे माणुसकीचा उत्सव” याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

पंढरपुरात पोहोचल्यानंतर वडील आणि मुलीने आनंदाने फुगडी खेळत आपल्या यशस्वी सायकल वारीचा आनंद साजरा केला. हा क्षण त्यांच्या दोन दिवसांच्या परिश्रमांचा, आनंदाचा आणि एकत्रितपणे पूर्ण केलेल्या स्वप्नाचा अविस्मरणीय साक्षीदार ठरला.

यावेळी राहूल शहा म्हणाले, “ही सायकल वारी केवळ प्रवास नव्हता. वडील-मुलीतील नातं अधिक दृढ करणारा, शिक्षणासाठी एआयचा संदेश देणारा आणि विठुरायाच्या कृपेचा अनुभव देणारा हा आयुष्यभर लक्षात राहणारा प्रवास आहे. या प्रवासात भेटलेल्या माणसांच्या प्रेमाने आणि मदतीने मानवतेवरील विश्वास अधिक दृढ झाला.”

श्रद्धा, शिक्षण, चिकाटी, कुटुंबातील जिव्हाळा आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणा यांची सुंदर सांगड घालणारी राहूल शहा आणि अनेरी शहा यांची ही फादर-डॉटर सायकल वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.I

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!