Friday, August 21, 2026
spot_img
Homeआरोग्यकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्न

कुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्न

कुष्ठरोग निर्मूलनाकरिता घरोघरी येणाऱ्या पथकास सहकार्य करावे-मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

पुणे 24 तास :- दि. 12 नोव्हेंबर 2025 : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुष्ठरोग निर्मूलनाची महात्मा गांधी सभागृह,जिल्हा परिषद येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा डॉ. रामचंद्र हंकारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वंदना वसावे जिल्हा सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. भाग्यश्री पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडीत करण्याकरिता घरोघरी येणाऱ्या पथकास नागरिकांनी सहकार्य करावे. करणेस सहकार्य करावे. कुष्ठरोग आजार हा सूचिबद्ध झाल्याने खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी याची नोंद शासकीय जिल्हा स्तरीय आरोग्य संस्थेत करणे बंधनकारक आहे, असेही पाटील म्हणाले.

गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद:

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत सर्व ग्रामीण व ठराविक शहरी भागात “कुष्ठ रुग्ण शोध मोहीम” राबविण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टर आणि आरोग्य संस्था यांनी कुष्ठरोग प्रतिबंध व उपचार मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.

डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी:

कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार असून योग्य वेळी निदान आणि नियमित औषधोपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होतो. परंतु उपचारात विलंब झाल्यास शरीरावर विकृती, दिव्यांगत्व निर्माण होऊ शकतो. राज्य शासनाने पुढील तीन वर्षांत “कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र” हे ध्येय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद करणे आणि ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल स्वरूपात सादर करणे सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय संस्थांना बंधनकारक राहील.या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन करतो.

डॉ भाग्यश्री पाटील, सहाय्यक संचालक कुष्ठरोग:

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार “कुष्ठरोग” हा आजार राज्यातील अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा निर्णय राज्य शासनाने “कुष्ठरोग निर्मूलन” या उद्दिष्टाच्या दिशेने घेतलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी निकट संपर्कातील व्यक्तींना केमोपोफिलॅक्सिस देण्याची सोय करण्यात येणार आहे.औषध-प्रतिरोधक कुष्ठरोग रुग्णांच्या निदान व व्यवस्थापनासाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!