Homeताज्या बातम्या“पुढच्या वेळी आईची मते मागू नका, महिलेची संतप्त प्रतिक्रिया

“पुढच्या वेळी आईची मते मागू नका, महिलेची संतप्त प्रतिक्रिया

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अबिदा अर्जुन बसवंत (७२)या गेल्या ४० वर्षांपासून पुण्यातील धायरी आणि कोथरूड या भागात कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात. पण त्यांच्या खालवत चाललेल्या प्रकृतीमुळे त्यांना हे काम पुढे सुरू ठेवणे कठीण जात आहे. अशात महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजणा सुरू केली आहे, यामुळे बसवंत यांना या योजनेतून मदतीची अपेक्षा आहे. त्यांनी या योजनेच्या लाभ घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांना तो मिळाला नाही, यासाठी त्यांचे वय कारणीभूत ठरले. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी घालून दिलेल्या पात्रतेच्या अटींमध्ये त्यांचे वय बसत नाही.

बसवंत यांचा मुलगा एका अॅपच्या माध्यमातून फूड डिलीव्हरी करणाऱ्या कंपनीत गिग वर्कर म्हणून काम करतो, पण त्याचा अपघात झाल्याने तो तीन महिन्यांपासून अंथरुणावर पडून आहे. अशा परिस्थितीत बसवंत यांनी योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “मला सांगण्यात आलं की, मला माझ्या वयामुळे बाद करण्यात आलं”.

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे,अशा महिलांना आर्थिक मदत दिली जाते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा मोठा फायदा झाला. महिलांनी त्यांच्या बाजूने भरभरून मतदान केले. दरम्यान आता सरकारने २४.३ दशलक्ष पात्र नसलेल्या लाभार्थ्यांची नावे या योजनेतून काढून टाकण्यासाठी छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बसवंत यांच्याप्रमाणे कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना या योजनेचा आणि छाननीचा काहीही फरक पडणार नाही. बसवंत यांच्या प्रमाणेच अन्नपूर्णा अत्तकारे (७०) या पर्वतीच्या पायथ्याला पानमळा झोपडपट्टीत राहातात. ही झोपडपट्टी माधूरी मिसाळ यांचा मतदारसंघ आहे आणि त्या राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!