Friday, August 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापुण्याच्या पोपट घनवट जमीन खरेदीव्यवहाराच्या चौकशीचे आदेश !

पुण्याच्या पोपट घनवट जमीन खरेदीव्यवहाराच्या चौकशीचे आदेश !

  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंजली दमानियांसह शेतकऱ्यांची बाजू ऐकली
  • तक्रारदार शेतकऱ्यांना सुरक्षा देणार
  • पुणे जिल्हाधिकारी चौकशी करणार
    तथ्य आढळल्यास एसआयटी लावणार

O

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील पाईट गावात पोपट घनवट यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा संपूर्ण व्यवहार तपासण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले.

बावनकुळे म्हणाले की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाची आठवड्याभरात चौकशी करून आठ एप्रिल रोजी अहवाल सरकारला सादर करावा असे सांगून अहवाल बघून आवश्यकता वाटल्यास एसआयटीमार्फत चौकशी करू. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी घनवट यांच्याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत, त्यांना संरक्षण देण्याचेही महसूल मंत्र्यांनी पुणे पोलिस व जिल्हा प्रशासनाला सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पाईट गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घनवट पिता पुत्रांनी कशा चुकीच्या पद्धतीने बळकावल्या आहेत, याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली.
मंत्रालयातील दालनात सायंकाळी बोलाविलेल्या बैठकीला अंजली दमानिया यांच्यासह तक्रारदार सात शेतकरी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. कोणीही जबरदस्तीने त्यांच्या जमीनी बळकावून घेऊ शकत नाही. जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून लवकरच सर्व जमिनींबाबत माहिती घेतली जाणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांसाठी जे काही शक्य आहे तेवढे करण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अंजली दमानिया यांनी सर्व शेतकऱ्यांच्यावतीने बाजू मांडताना सांगितले की, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज आणि जगमित्र शुगर्स या संस्थांच्या माध्यमातून घनवट आणि धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे हे संचालक आहेत. त्यांचा आधार घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावल्या आहेत. शंकर रौंदळ नावाचा बनावट शेतकरी उभा करुन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धमकावून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच काही शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्या गावातील त्याच नावाचे शेतकरी उभे करुन सह्या घेतल्या आहेत. तर तक्रारदारांनी घनवट यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन स्वतःचा बंगला उभारण्यात आल्याचीही तक्रार केली. घनवट यांनी अधिकाऱ्यांना धमकावून तक्रारदारांवर खोटे खटले दाखल केल्याचेही निदर्शनास आणून दिले.
या सर्व बाबींची चौकशी करुन ८ एप्रिल रोजी याबाबत बैठक घेण्यात येणार असून याप्रकरणी कोणती कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना दिले.

चौकट
महसूलमंत्र्यांचे दमानियांकडून कौतुक

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल आणि चौकशी करण्याचे आदेश दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूलमंत्र्यांचे कौतुक केले. राज्याला आपल्यासारखे कणखर महसूलमंत्री लाभल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भावनाही त्यांनी बैठकीत व माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!