पुणे (पुणे 24तास ब्युरो)
सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, भूमि अभिलेख विभागात कमी असलेली कर्मचा-यांची संख्या वाढवावी.भूकरमाकांना लॅपटॉप द्यावेत, मोजणीसा़ठी रोव्हरची संख्या वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य भूमिलेख कर्मचारी संघटनेच्या पुणे विभागातील कर्मचा-यांनी मंगळवारी सामुहिक रजा आंदोलन सुरू केले. दरम्यान संघटनेच्या पदाधिका-यांबरोबर विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन भूमिअभिलेखच्या राज्य आयुक्त कार्यालयासमोर सुरू आहे.
या आंदोलनात भूमिअभिलेख विभागात कार्यरत असलेले भूकरमापक , परिरक्षण भूमापक (एम.एस.),शिरस्तेदार, मुख्यालय सहाय्यक तसेच लेखनिक सहभागी झाले आहेत. या कर्मचा-यांनी 2014 साली देखील आंदोलन केले होते.त्यावेळीचे 21 दिवसांचे वेतन शासनाकडे थकीत असून ते अजुनपर्यत मिळालेले नाही. विभागाचे अधिकारी कर्मचा-यांवर जादाची मोजणी प्रकरणे वाढविण्यासाठी दबाब आणत आहेत. मोजणी करण्यासाठी भूकरमापकांना विभागाकडून कोणतीही सोयी सुविधा मिळत नाहीत. मोजणीसाठी नवीन व्हर्जन 2.0 यासाठी कार्यालयाने सामुग्रीची पूर्तता करावी. तांत्रिक वेतनश्रेणी वाढवावी.याबरोबरच शिपाई कर्मचा-यांची भरती करावी यासह इतर अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.
कर्मचा-यांच्या मागण्याबरोबर आंदोलन मागे घेण्यासाठी भूमिअभिलेखच्या पुणे विभागाचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी संघटनेचे (पुणे विभाग ) अध्यक्ष विजय पिसाळ, कार्याध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस, अजित लांडे, धनाजी बाबर, जिल्हाध्यक्ष सदानंद मोरडे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत तांत्रिक वेतनश्रेणी बाबत शासनकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, एका महिन्यात निर्णय घेण्याचा प्रयत्न करू असे सांगण्यात आले. तसेच 2014 साली करण्यात आलेल्या आंदोलनातील 21 दिवसांचे वेतन मिळावे यासाठी दहा दिवसात शासनाकडे प्रस्ताव सादर करून असे सांगण्यात आले.
——————————–
चौकट
कर्मचार्यांनी आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकारी कर्मचार्यांची गळचेपी करत आहे व आंदोलन न करता आपापल्या कामावर हजर व्हावे, असा दबाव आणत आहेत.असा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला.
——————————-

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह






















