Homeताज्या बातम्याराजस्थानातील एकाकडून २२ लाख रुपयांची अफू जप्त

राजस्थानातील एकाकडून २२ लाख रुपयांची अफू जप्त

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

राजस्थानातून अफू विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात पकडले. त्याच्याकडून २१ लाख ८० हजार रुपयांची एक किलो ९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. नाथूराम जीवनराम जाट (वय ५२, रा. असावरी, जि. नागोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाट याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा भागातील अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाारी गस्त घालत होते. त्या वेळी जाट तेथून निघाला होता. त्याच्याकडे पिशवी होती. पोलिसांच्या पथकाने संशयावरुन त्याची चौकशी केली. पिशवीची तपासणी केली. तेव्हा पिशवीत अफू सापडली.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, दयानंद तेलंगे पाटील, संदीप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर यांनी ही कारवाई केली.
झटपट पैसे कमाविण्यासाठी अफू विक्री
आरोपी नाथूराम जाट मूळचा राजस्थानातील आहे. तो पूर्वी फर्निचरचे काम करायचा. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याने राजस्थानातून अफू विक्रीस आणली होती. त्याने आतापर्यंत कोणाला अफू विक्री केली, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!