Homeताज्या बातम्याशिवजयंती दिनी शिवप्रेमींना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

शिवजयंती दिनी शिवप्रेमींना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे  ( पुणे 24 तास ब्युरो  )

आगामी शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना पुरेसे पिण्याचे पाणी, वैद्यकीय उपचार, औषधे आदी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने शिवजयंती उत्सव यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

शिवजयंतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनावणे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तहसीलदार सुनिल शेळके, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर आदी उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव नेहमीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याच्यादृष्टीने सर्व विभागांनी सतत समन्वयात रहावे. किल्ल्याची साफसफाई चांगल्या प्रकारे होईल यासाठी आवश्यक ती साधने पुरवावीत. नागरीकांना पुरविण्यासाठीच्या पिण्याच्या पाण्याची दोनदा तपासणी करावी. शिवजयंतीसाठी गतवर्षी आलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेत यावर्षीचा अंदाज घेऊन शौचालयांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या बूथवर मुबलक औषधे व ओआरएसची पाकिटे ठेवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले, किल्ल्याची सर्व स्वच्छता पुरातत्व विभागाने करावी, नगर परिषदेने स्वच्छ पाणी पुरवठा करावा, राज्य परिवहन महामंडळाने चांगल्या बसेस पुरवाव्यात, शिवजयंतीच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यांची काळजी घ्यावी. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने नेहमीसारखे स्थानिक नागरिकांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.यावेळी आमदार श्री. सोनवणे यांनीही विविध सूचना केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!