Homeताज्या बातम्याशिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे;
राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे ;( पुणे 24 तास ब्युरो )

शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी 99 वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शिवाजीनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शिवाजीनगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे. हा प्रकल्प निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी येत्या महाराष्ट्र दिनी (दि. 1 मे 2025) या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्यादृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना जलद आणि सुयोग्य सुविधा लवकरच मिळणार आहेत. शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तो ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ या तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात ‘महामेट्रो’ प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे. त्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात नवा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वारगेट येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारणीसाठी आवश्यक त्या कार्यवाही पूर्ण कराव्यात. शिवाजीनगर बसस्थानकासह स्वारगेट बसस्थानकाच्या विकासाचा प्रकल्पसुध्दा पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, तो वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
 आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी.
 वाहनतळासाठी दोन तळघर.
 किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट.
 बसस्थानक तळमजल्यावर, बसआगार पहिल्या मजल्यावर आणि बसवाहनतळ दुसऱ्या मजल्यावर.
 शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी 16 मजली इमारत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!