Homeताज्या बातम्यासनई वादन आणि शास्त्रीय गायन 'कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

सनई वादन आणि शास्त्रीय गायन ‘कार्यक्रमास चांगला प्रतिसाद

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘सनई वादन आणि शास्त्रीय गायन’  कार्यक्रमास शुक्रवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.पं.शैलेश भागवत यांनी शैलीदार सनई वादन सादर केले तर डॉ.पराग चौधरी यांनी बहारदार भारतीय शास्त्रीय गायन सादर केले.हा कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स च्या पुणे विभागीय कार्यालयाने प्रस्तुत केला.शुक्रवार,दि.२४  जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) सभागृहात हा कार्यक्रम झाला.

पं.शैलेश भागवत यांना गणेश तानवडे(तबला), उमेश पुरोहित(हार्मोनियम),केदार जाधव,चंद्रशेखर परांजपे(सनई)यांनी साथसंगत केली.डॉ.पराग चौधरी यांना संकेत सुवर्णपाटकी(हार्मोनियम),महेश सोळुंके (तबला),शंकर विधाते(व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा २३३ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत केले.इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स चे पुणे विभागीय कार्यालयाचे संचालक सुदर्शन शेट्टी यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. पराग चौधरी यांनी पुरिया धनश्री रागाने गायनाला प्रारंभ केला.’सुमिरन करो मन राम ‘ ही कबीर यांची रचना, ‘ अखियाँ हरी दर्शन की प्यासी’ हा सूरदासांचा अभंग वाहवा मिळवून गेला.

पं.शैलेश भागवत यांनी श्याम कल्याण राग सादर केला,धून सादर केली.दोन्ही सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स चे पुणे विभागीय कार्यालय चे  सुदर्शन शेट्टी,संजीवनी स्वामी,ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!