Homeताज्या बातम्यासह दुय्यम निबंधकपदी लिपिकांच्या नेमणुकीस मनाई

सह दुय्यम निबंधकपदी लिपिकांच्या नेमणुकीस मनाई

शहरातील निम्म्या नोंदणी कार्यालयांचे कामकाज होणार ठप्प

पुणे : पुढारी प्रतिनिधी

नोंदणी विभागातील सह दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक अशा जबाबदार पदांच्या रिक्त जागेवर खात्यातील वरिष्ठ वा कनिष्ठ लिपिकांच्या नेमणुका करू नयेत, असे आदेश राज्य शासनाने बुधवारी (दि.5) जारी केले. त्यामुळे पुणे शहराबरोबरच राज्यातील अनेक उप निबंधक कार्यालयातील नोंदणीचे काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नोंदणी विभागात सह दुय्यम निबंधक वर्ग-2, सह जिल्हा निबंधक वर्ग-2 आणि मुद्रांक उप अधिक्षक या संवर्गात 260 पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल 85 पदे रिक्त आहेत. त्यामुळे नोंदणीची कामे खोळंबू नयेत या उद्देशाने या रिक्त पदांवर वरिष्ठ वा कनिष्ठ लिपिकांची नेमणूक करण्यात येत असे. त्याखेरीज रजेवर जाणार्‍या अधिकार्‍यांच्या जागीही प्रतिनियुक्तीवर लिपिकांना पाठविण्यात येत असे. तथापि, शासनाच्या महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी सुनील जाधव यांनी बुधवारी जारी केलेल्या एका परिपत्रकाने अशा नेमणुकांवर बंदी घातली आहे.

त्यामुळे राज्यातील 85 दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक यू. के. चव्हाण यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, ते म्हणाले की, शासनाचे परिपत्रक आज सायंकाळीच मिळाले असून, त्यानुसार राज्यातील सर्व सह जिल्हा उपनिबंधकांकडून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत ही सर्व माहिती मुख्यालयाकडे उपलब्ध होईल, त्यानंतर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक या रिक्त जागांवरील नियुक्त्यांबाबतचा निर्णय घेतील.

पुणे शहरातील 27 नोंदणी कार्यालये आहेत. त्यापैकी 13 कार्यालयांतील सह दुय्यम निबंधकांच्या जागी वरिष्ठ वा कनिष्ठ लिपिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासूनच केली गेल्यास शहरातील हवेली- 1 (मामलेदार कचेरी), हवेली -2 (बिबवेवाडी), हवेली- 3 (मगरपट्टा सिटी), हवेली- 4 (बावधन), हवेली -7 (चंदननगर), हवेली- 10 (जेडीआर), हवेली- 11 (जेडीआर), हवेली- 12 (कोंढवा), हवेली -14 (भोसरी), हवेली -17 आणि हवेली- 25(दापोडी) आणि हवेली- 18 (पिंपरी) या कार्यालयांचे कामकाज ठप्प होऊ शकेल. यापैकी एका जागेवर दुय्यम निबंधक श्रेणी- 1 ची नियुक्ती करता येणे शक्य असल्याचे सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले.

सह दुय्यम निबंधक पदावर प्रतिनियुक्तीवर काम करणार्‍या वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकांना कायद्याचे परिपूर्ण ज्ञान नसल्याने त्यांच्याकडून दस्तावेज नोंदणीमध्ये अनेक चुका झाल्याचे तसेच पक्षकार व वकिलांच्या दबावांमुळे त्यांच्याकडून बेकायदेशीर दस्त नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच शासनाने त्यांच्या नियुक्तीवर मनाई करणारे आदेश जारी केले असल्याचे कार्यासन अधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

या आदेशाची कार्यवाही झाल्यास शहरातील 80 टक्के नोंदणी कार्यालयातील दस्त नोंदणी प्रक्रिया ठप्प होईल, तसेच श्रेणी 1 च्या अधिकार्‍यांना श्रेणी- 2 चा चार्ज दिल्यास नोंदणी खात्यात सावळागोंधळ होईल, असे मत अवधूत लॉ फाउंडेशनेच मार्गदर्शक श्रीकांत जोशी व सदस्य अ‍ॅड. कैलास थोरात यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!