Homeताज्या बातम्यालोणावळ्याचे परिरक्षण भूमापक विनायक वाघचौरे तडकाफडकी निलंबित

लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक विनायक वाघचौरे तडकाफडकी निलंबित

लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक विनायक वाघचौरे तडकाफडकी निलंबित
उपअधिक्षक पल्लवी पाटील- पिंगळे यांचीही विभागीय चौकशी
पुणे, :(पुणे 24तास ब्युरो )
कामामधील अनियमता आणि अक्षम्य विलंबा प्रकरणी लोणावळा येथील परिरक्षक भूमापक (मेंटेनन्स सर्व्हेअर) विनायक वाघचौरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून वडगाव मावळच्या उपअधिक्षक पल्लवी पाटील पिंगळे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहे.
जमाबंदी आयुक्त कार्यालयाने मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी) हे आदेश जारी केले आहेत. वाघचौरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्याने जमाबंदी कार्यालयाने त्यांच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. वाघचौरे यांच्या बरोबरच राज्यातील अनेक कार्यालयांची दप्तर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दिरंगाई आणि अनियमितता आढळून आल्याने वाघचौरे यांच्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील नागोठणे येथील परिरक्षण भूमापक राहुल भोसले यांनाही निलंबित करण्यात आले असल्याचे येथील भूमि अभिलेख उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी सांगितले.
सिटी सर्व्हे अंतर्गत जमिनीची मोजणी, वारस नोंद, मालमत्तांच्या व जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंद इत्यादींसाठी सिटी सर्व्हे कार्यालयाकडे नागरिकांचे अर्ज येत असतात. नियमानुसार 25 दिवसांत ते निकाली काढणे वा त्यानुसार नोंदी करून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याची माहिती पाठविणे अपेक्षित असते. तथापि, वाघचौरे यांच्याकडील अनेक प्रकरणात वर्ष उलटून गेले तरी काहीच कार्यवाही होत नाही, अशा तक्रारी होत्या. विलंबामुळे लाचखोरीचेही आरोप होत होते. या तक्रारी लक्षात घेऊन जमाबंदी आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन अधीक्षकांमार्फत वाघचौरे यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या कार्यालयातील अनेक अर्ज 250 दिवस, 300 दिवस, काही तर 400 दिवसांपासून थकीत असल्याचे आढळून आले. तर काही अर्जाबाबत फाईल आढळत नसल्याचे शेरे दिल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारांमुळे खात्याची प्रतिभा मलिन होत असल्याने संबंधित अधिकार्‍याच्या निलंबनाची कारवाई आवश्यक ठरते, असेही गोळे यांनी स्पष्ट केले.
परिरक्षण भूमाकक वाघचौरे यांच्या कामावर सुपरव्हिजन करण्याची (देखरेख ठेवण्याचाी) जबाबदारी उप अधिक्षकाची असते. या तपासणीत त्याकडे पल्लवी पाटील- पिंगळे यांचेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे गोळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!