Friday, August 21, 2026
spot_img
Homeउद्योगपीएम सूर्यघर योजनेच्या जागरासाठी सौर रथाद्वारे थेट विजग्राहकाशी संवाद

पीएम सूर्यघर योजनेच्या जागरासाठी सौर रथाद्वारे थेट विजग्राहकाशी संवाद

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये डिजिटल सौर रथाच्या माध्यमातून आठवड्याभरात तब्बल ५० हजारांवर वीजग्राहकांशी महावितरणकडून थेट संवाद साधण्यात आला तसेच डिजिटल स्क्रीनद्वारे संवाद, सादरीकरण व माहिती पत्रकांद्वारे या योजनेची माहिती देण्यात आली.

घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आहे. या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (मास्मा) यांच्या सहकार्याने सौर रथाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते सौर रथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, मास्माचे अध्यक्ष श्री. शशिकांत वाकडे, खजीनदार श्री. समीर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सौर रथाच्या डिजिटल स्क्रिनद्वारे योजनेची माहिती देताना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, ‘मास्मा’चे श्री. समीर गांधी यांनी नागरिकांशी आठवडाभर संवाद साधला. तसेच उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी या योजनेचे फायदे, ऑनलाइन अर्ज, मिळणारे अनुदान आदींचे संगणकीय सादरीकरण केले. हीच माहिती पत्रकांद्वारे देखील देण्यात आली.

आठवडाभर प्रामुख्याने दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत या सौर रथासोबत संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंते, सहायक अभियंते व जनमित्रांनी सोसायट्या, अपार्टमेंट्समधील नागरिकांशी संवाद साधला. योजनेची माहिती दिली. यात शिवाजीनगर, बावधन, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, काळेवाडी, भोसरी, मोशी, चऱ्होली, वारजे, कोथरूड, स्वारगेट, धनकवडी, पद्मावती, पर्वती, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, हिंगणे, धायरी, नऱ्हे, एरंडवणे आदी भागात या सौर रथाद्वारे जागर करण्यात आला. या सौररथाच्या जागर मोहिमेत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. शेखर मुरकुटे यांच्यासह अभियंते, जनमित्रांसह ‘मास्मा’चे रोहन उपासनी, संदीप गदबरे, नरेंद्र पवार, स्वप्निल बाथे आदींनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!